मुंबई :महाराष्ट्रात सत्तेची चावी कोणाच्या हाती असणार? याचा निकाल लागायला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी राज्यात कुणाची सत्ता येणार? यावर अद्यापही अनेक तर्क वितर्क सुरू असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची मात्र बंडखोरांच्या हाती असल्याचं चित्र आहे. राज्यातील विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी तब्बल 63 जागांवर बंडखोरांनी 'काटे की टक्कर' दिली असल्यानं राज्याच्या सत्ताबाजारात बंडखोरांचा भाव वधारला आहे.
जादुई आकडा कोणाला भेटेल? :राज्यात विधानसभेच्या एकूण 288 पैकी सत्ता स्थापनेसाठी लागणारा 145 चा जादुई आकडा कोणाला भेटेल? यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. परंतु राज्यात तब्बल महत्त्वाच्या 63 जागांवर बंडखोरांनी 'काटे की टक्कर' दिल्यानं सत्ता स्थापनेसाठी बंडखोर महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. राज्यात महायुतीत भाजप 148 जागा, शिवसेना 83 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 52 जगांवर उमेदवार उभे केले आहेत. यापैकी 31 जागांवर बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून 7 जागांवर अधिकृत आणि बंडखोर उमेदवार हे एकाच पक्षाचे आहेत. त्यातच अशा एकूण 15 जागा आहेत, जिथे अधिकृत आणि बंडखोर उमेदवार हे महाविकास आघाडीच्या पक्ष्यांशी संबंधित आहेत.
शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात भाजपाचे 5 बंडखोर रिंगणात
अक्कलकुवा
आमशा पाडवी (शिवसेना)
हिना गावित (भाजप बंडखोर)
पाचोरा
किशोर पाटील (शिवसेना)
अमोल शिंदे (भाजप बंडखोर)
नांदेड दक्षिण
आनंद पाटील (शिवसेना) संजय घोगरे (भाजपा)
सावंतवाडी
दीपक केसरकर (शिवसेना) विशाल परब (भाजपा बंडखोर)
अलिबाग
महेंद्र दळवी (शिवसेना) दिलीप भोईर (भाजपा बंडखोर)
राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजपाचे 6 बंडखोर रिंगणात
अमळनेर
अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिरीष चौधरी (भाजपा बंडखोर)
अमरावती
सुलभा खोडके (राष्ट्रवादी काँग्रेस)
जगदीश गुप्ता (भाजप बंडखोर)
अहेरी
धर्मराव आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस)
अंबरीशराव आत्राम (भाजपा बंडखोर)
जुन्नर
अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस)
आशाताई बुचाके (भाजपा बंडखोर)
अकोला
किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
वैभव पिचड (भाजपा बंडखोर)
भाजपा विरोधात शिवसेनेचे 5 बंडखोर रिंगणात
फुलंब्री
अनुराधा गायकवाड (भाजपा) रमेश पवार (शिवसेना)
विक्रमगड
हरिश्चंद्र भोये (भाजपा)
प्रकाश निकम (शिवसेना)
कल्याण पूर्व
सुलभा गायकवाड (भाजपा) महेश गायकवाड (शिवसेना)
ऐरोली
गणेश नाईक (भाजपा)
विजय चौगुले (शिवसेना)
बेलापूर
मंदा म्हात्रे (भाजपा)
विजय नाहटा (शिवसेना)
राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेनेचे 3 बंडखोर रिंगणात
देवळाली
सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
राजश्री अहिरराव (शिवसेना)
मानखुर्द - शिवाजीनगर
नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)
सुरेश पाटील (शिवसेना)
अहमदनगर शहर
संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
शशिकांत गाडे (शिवसेना)
भाजपा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस 2 बंडखोर रिंगणात
मोर्शी
उमेश यावलकर (भाजप), देवेंद्र भुयार (राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर)
काटोल
चरणसिंह ठाकुर (भाजप), अनिल शंकरराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर)