शिर्डी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला जागा मिळतील. आम्हाला जागा मिळाल्या नाही तर आम्ही काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढू. मात्र अनेक ठिकाणी भाजपा आणि महायुतीला आरपीआयची आवशकता आहे. त्यामुळं आम्हाला जिल्हा परिषदेला चार ते पाच जागा मिळाव्या अशी मागणी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली.
सुरेश धसांनी मुंडेंची भेट घेणं योग्य नव्हतं : सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेण्याची गरज नव्हती. संतोष देशमुख हत्याकांडाचा पाठपुरावा करून त्यांनी संपूर्ण प्रकरण जनतेसमोर आणलं. मात्र अशा परिस्थितीत सुरेश धसांनी मुंडेंची भेट घेणं योग्य नव्हतं. धनंजय मुंडेंचा संतोष देशमुख यांच्या खुनशी काही संबंध नाही, असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. मात्र, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी अनेक लोकांची मागणी आहे. मात्र यावर अजित पवारांचं म्हणणं आहे तेही बरोबर आहे, धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध झाले पाहिजेत. धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचे सबंध होते. मात्र या प्रकरणात त्यांचा सबंध नसावा असंही यावेळी आठवले म्हणाले.