सोलापूर: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा गुरुवारी दुपारी सोलापुरात आले होते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मारवाडी समाजाला संबोधित करत भाजपाला मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलं.
मारवाडी समाजाची मतदार संख्या जास्त :सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मारवाडी समाजाची मतदार संख्या मोठ्या संख्येने आहे. त्यामुळं भाजपाचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचाराला भजनलाल शर्मा सोलापुरात आले होते. सोलापुरातील मारवाडी समाजाचा राजस्थान राज्याशी घनिष्ठ संबंध आहे. सोलापूर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार मारवाडी समाज वास्तव्यास आहे. भारत देशात राजस्थानी लोकांचं अनन्यसाधारण महत्व आहे. देश विकसित करण्यासाठी मारवाडी समाजानं किंवा मारवाडी समाजाची भूमिका महत्वाची आहे असं स्पष्टीकरण भजनलाल शर्मा यांनी दिलं.
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (ETV Bharat Reporter) काँग्रेसची विभाजीकरण नीती: काँग्रेस भ्रष्टाचाराची जननी आहे. निवडणुकीत काँग्रेस फक्त आश्वसने देत आहे. समाजात तेढ निर्माण करण्याच काम काँग्रेसनं केल्याची टीका मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केलं. काँग्रेसनं महाविकास आघाडी नाही तर ठगबंधन केलं. महाराष्ट्र राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवरील आहे. काँग्रेसच्या किंवा ठगबंधनच्या पाठीमागे जाऊ नका असं मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले.
महाविकास आघाडी ही 'आतंकवादी' समर्थक : महाविकास आघाडीच्या पाठीमागे जाऊ नका. हे लोक 'आतंकवादी' समर्थक आहेत. महाविकास आघाडीमधील उमेदवारांच्या पाठीमागे राहिला आणि त्यांना मतदान केलं तर याकूब मेमनच्या कबरीला सजावट अशा दुर्दैवी घटना घडतील, असा टोला भजनलाल यांनी महाविकास आघाडीला लगावला. राज्यातील महायुती सरकारच्या पाठीमागे रहा असं आवाहन त्यांनी केलं. राजस्थान राज्याशी जे निगडित आहेत त्यांनी राजस्थानला अवश्य यावं असं मुख्यमंत्री शर्मा म्हणाले.
हेही वाचा -
- मुलुंडमध्ये भाजपा गड राखणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार? जाणून घ्या मतदारसंघाची गणितं
- सायन-कोळीवाड्यातून तमील सेल्वन पुन्हा विजय मिळवण्याच्या तयारीत, नेमकी रणनीती काय?
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी सर्वच राजकीय पक्षांचं "दे धन धना धन"