अमरावती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. चार हजारांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं. तर राज्यात मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22 टक्के मतदान झालं.
आईसोबत पोहचली मतदान केंद्रावर :उमेदवार प्रीती बंड यांनी बुधवारी दुपारी सव्वा चार वाजता रुक्मिणी नगर परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. तर त्यांची कन्या सावी बंड ही त्यांच्यासोबत मतदान केंद्रावर पोहोचली होती.
प्रतिक्रिया देताना सावी बंड (Etv Bharat Reporter) "वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर पहिल्यांदाच मतदार यादीत नाव नोंदवलं होतं. आता निवडणुकीत मतदान केंद्रावर जात आयुष्यातलं पहिलं मत हे आपल्या आईलाच देण्याचं भाग्य मला लाभलं". - सावी बंड, कन्या, प्रीती बंड
प्रत्येकानं करावं मतदान : "मी माझ्या आयुष्यातलं पहिलं मत दिलं आणि विशेष म्हणजे हे मत मी माझ्या आईलाच दिलं. नागरिकांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजवायला हवा. कोणी कोणालाही मतदान करावं याबाबत मी काही म्हणणार नाही, मात्र प्रत्येकानं मतदान करण्याकरिता मतदान केंद्रावर पोहोचावं," असं आव्हान देखील सावी बंड हिनं केलं होतं.
'यांनी' बजावला मतदानाचा हक्क : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा होती. महाराष्ट्रातील प्रत्येक भागामध्ये मतदान पार पडलं. लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावून उभे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सहकुटुंब मतदान केलं.
कडू यांचा प्रीती बंड यांना पाठिंबा : बडनेरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) बंडखोर, अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांना आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानं बिनशर्त पाठिंबा दिलाय. प्रीती बंड यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी बडनेरा येथील आठवडी बाजार मैदानावर जाहीर सभा घेतली होती.
हेही वाचा -
- कोल्हापुरात ठाकरे-शिंदेंचे कार्यकर्ते आमने-सामने, सतेज पाटील यांनी केलं शांत राहण्याचं आवाहन
- महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यासाठी कराड दक्षिणच्या जनतेचं मतदान; पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
- मुंबईत शिंदे गट अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीचे कारण काय?