महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

महाविकास आघाडी राहिली 'वंचित', प्रकाश आंबेडकर यांनी ८ जागांवरील उमेदवारांची केली घोषणा - Prakash Ambedkar news - PRAKASH AMBEDKAR NEWS

Prakash Ambedkar News वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबतची जागावाटपाची बोलणी अयशस्वी ठरल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ८ जागासांठी उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडीत वंचित सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

Vanchit Bahujan Aghadi declare 8 candidates
Vanchit Bahujan Aghadi declare 8 candidates

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 12:05 PM IST

Updated : Mar 27, 2024, 12:45 PM IST

अकोलाPrakash Ambedkar News-वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकरांकडून ८ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. युती करण्याबाबात ते मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यांशी चर्चा करणार आहोत. जरांगे ३० मार्चपर्यंत थांबा म्हणाल्यानं थांबलो आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर स्वत: लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, " सांगलीमधून प्रकाश शेंडगे यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देणार आहोत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या विकास ठाकरेंना पाठिंबा देण्यात आला आहे. रामटेकमधील उमेदवाराच्या नावाची घोषणा आज संध्याकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे."

वंचित बहूजन आघाडी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे.

  • भंडारा गोंदिया -संजय गजानन केवट
  • गडचिरोली -हितेश पांडुरंग मडावी
  • चंद्रपूर -राजेश बेले
  • बुलडाणा -वंसत मगर
  • अकोला -प्रकाश अंबेडकर
  • अमरावती- प्राजक्ता पिल्लेवार
  • वर्धा -प्रा. राजेंद्र साळुंखे
  • यवतमाळ वाशिम - खेमसिंग पवार

अंतिम यादी २ एप्रिलपर्यंत जाहीर होईल-मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "परिवर्तनाच्या राजकारणाला नव्याने सुरुवात करण्याबाबत मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली. जास्तीत जास्त उमेदवार हे गरीब समुदायातील असणार आहेत. त्यांनाच पुढे आणले जाईल," अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पुढे आंबेडकर म्हणाले की, जे स्वच्छ चारित्र्याचे आणि गरीब आहेत आणि काहीतरी करण्यासाठी प्रयत्न आहेत, त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. अंतिम यादी ही 2 एप्रिलपर्यंत जाहीर होईल. एक नवीन आघाडी आम्ही उभी करत आहोत. आम्ही त्यांना सांगत होतो की, जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण ते मान्य करायला तयार नव्हते. वंचित बहुजन आघाडीचा वापर हा घराणेशाही वाचवण्यासाठी केला जात होता. त्याला आम्ही नाकारले आहे.

वंचितच्या उमेदवारांना जरांगे पाटील यांचे समर्थन-आंबेडकर म्हणाले की, "महाराष्ट्रात उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लीम यांची नवीन वाटचाल आहे, असे आम्ही मानतो. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील वंचितच्या उमेदवारांना जरांगे पाटील यांचं समर्थन आहे. 30 तारखेनंतर काही जागांबाबत आम्ही दोघे मिळून निर्णय घेणार आहोत," असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

हे नेते पत्रकार परिषदेला उपस्थित-वंचितची पत्रकार परिषद अकोल्यातील हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, ज्येष्ठ नेते अशोकभाऊ सोनोने, राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद, महिला आघाडी राज्य महासचिव अरुंधती शिरसाट, राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासह राज्य कार्यकारणीचे सदस्य आणि पदाधिकारी हजर होते.

हेही वाचा-

  1. प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले 'आता आम्हाला सत्तेत जायचंय'; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होणार? - Manoj Jarange Patil
  2. आजोबांनी चालवलेली चळवळ लाचार करून संपवू नका - ॲड. प्रकाश आंबेडकर - Adv Prakash Ambedkar
  3. प्रकाश आंबेडकरांचा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न फसणार? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत - PRAKASH AMBEDKAR
Last Updated : Mar 27, 2024, 12:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details