प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे पुणे MP Supriya Sule On Pawar Family : राष्ट्रवादीत फुटीनंतर सातत्यानं अजित पवार (Ajit Pawar) हे आपण वेगळे झालो असल्याचं सांगत आहेत. शिरूरच्या सभेत अजित पवार यांनी आम्ही वेगळे झालो असल्याचं वक्तव्य केलं होतं. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी लोकशाहीत काम करते. मी माझे वैयक्तिक संबंध कधीही लपवलं नाही. माझे वैयक्तिक संबंध सर्वच राजकीय लोकांशी असतात. सगळ्यांशी मतभेद हे वैचारिक आणि राजकीय आहेत."
पवार कुटुंबात फूट नाही : पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, "ही लोकशाही आहे, येथे प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आहे. प्रत्येकाची बोलायची स्टाईल असते. राष्ट्रवादी पक्षामध्ये अजूनही फूट नाही. पवार कुटुंबातही फूट पडलेली नाहीय. कोणी कसं वागायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे. आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि खासगी आयुष्य मिक्स करु शकत नाही. एवढं वय आणि वैचारिक प्रगल्भता आमच्यात आली पाहिजे."
जागावाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल :खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी भारती विद्यापीठ येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांना महाविकास आघाडीच्या जागांच्या बाबतीतही प्रश्न विचारण्यात आला होता. "मला वाटत नाही की खूप काही अडचण येणार आहे. येत्या 2 दिवसात आघाडीच्या जागावाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल," असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
लोकशाहीकडून दडपशाहीकडं वाटचाल : मुख्यमंत्र्यांच्या सभेला महिला बचत गटाच्या महिलांना बोलावलं जातं. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मला याबाबत काहीही आश्चर्य वाटत नाही. आता लोकशाहीकडून दडपशाहीकडं आपण चाललो आहोत. विधानसभेत सत्तेतील आमदारांच्या मारामारी होत असेल तर काय सांगायचं आणि याहून गलिच्छ काय असू शकतं नाही."
हेही वाचा -
- घराणेशाहीवरुन अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, "इंडिया आघाडीतील...."
- मुंबईत युवा महाराष्ट्रभिमान मेळावा; लोकसभेसाठी 'मविआ'तील युवा संघटनांही आखणार एकत्रित रणनिती
- तुमचा पक्ष भाजपात जाणार नाही याची खात्री द्या; प्रकाश आंबेडकरांचं आव्हाड यांना प्रत्युत्तर