प्रतिक्रिया देताना नाना पटोले (Mumbai Reporter) मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर काही पक्ष काँग्रेससोबत जातील किंवा त्यातील काही पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला होता. या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठं विधान केलं आहे.
काही प्रस्ताव आले असल्याची माहिती : लोकसभा निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष सोबत जातील किंवा त्यातील काही पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यावर नाना पटोले म्हणाले की, अनेक पक्षांनी काँग्रेस पक्षात विलनीकरणाचा प्रस्ताव काँग्रेस हाय कमांडकडं दिला आहे, असं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला पुण्याच्या सभेत सांगितलं. त्यामुळं ते असंच चालत राहणार आहे.
काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत काय चर्चा होतात यात काँग्रेस पक्षाला पडायचं नाही. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. जे काही आमचे मित्र पक्ष आहे ते सोबत घेऊन भाजपा सारख्या तानाशाही सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा काँग्रेस पक्षाचा हा मूळ उद्देश आहे. शरद पवार काय बोलतात किंवा अजित पवार काय बोलतात याच्यात आम्हाला पडायचं नसल्याचं महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.
जनतेचे प्रश्न महत्त्वाचे : राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, राज्याला अधोगतीला नेण्याचं काम जे भाजपाने सत्तेच्या माध्यमातून केलं आहे. त्यामुळं कुठल्या पक्षात काय चाललं त्यापेक्षा जनतेच्या प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे असल्याचही नाना पटोले म्हणाले .
हेही वाचा -
- प्रतापराव भोसले यांच्या निधनानं सुसंस्कृत, निष्ठावान नेतृत्व हरपलं... नाना पटोले यांची प्रतिक्रिया - Prataprao Bhosale Death
- 'इंडिया' आघाडी पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदींना अद्यापही नवाज शरीफांच्या केकची आठवण; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले संघावर घालतील बंदी - India Alliance Press Conference
- मुख्यमंत्री पदी शिंदे यांच्या नावाला संजय राऊत यांचाच विरोध, उमेश पाटील यांचा खुलासा - Umesh Patil About CM Post