नांदेड Uddhav Thackeray On MNS BJP Alliance : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी (19 मार्च) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यामुळं लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर जोरदार टीका केलीय. तसंच भाजपा अजून एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करतोय, असा घणाघातही त्यांनी केलाय.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? : मराठवाडा दौऱ्यावर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडच्या सभेत बोलत असताना भाजपावर सडकून टीका केली. "भाजपाचं बियाणं बोगस आहे, म्हणून त्यांच्यावर बाहेरून माणसं घेण्याची वेळ आलीय. तसंच महाराष्ट्रात मोदींच्या नावानं नाही तर ठाकरे नावानं मतं मिळतात, हे त्यांना समजलंय. त्यामुळं ते आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करताय", अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.