महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"माझ्याविरोधात बोलले त्यांना मागच्या..."; मनोज जरांगे पाटलांचा पंकजा मुंडेंना टोला - Maratha OBC Reservation - MARATHA OBC RESERVATION

Manoj Jarange Patil on Pankaja Munde : पुण्यात रविवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता सभा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी सभेत बोलताना त्यांनी पंकजा मुंडेंवर भाष्य केलं.

Maratha Reservation News
मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 10:11 AM IST

पुणे Manoj Jarange Patil on Pankaja Munde : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोलापूर, सांगली, कोल्हापूर, साताऱ्यानंतर रविवारी पुण्यात शांतता रॅली पार पडली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारकडं ज्या ज्या मागण्या केल्या आहेत, त्या जर सरकारनं 29 तारखेपर्यंत मान्य केल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीत आमदार पाडायचे की, उभे करायचे हा निर्णय घेणार. 29 तारखेला त्यांनी अंतरवाली येथे समाजाची बैठक बोलावली आहे. समाजातील सर्वच लोकांनी या बैठकीला यायचं, असं आवाहन जरांगेंनी समाजाला केलंय.

पुण्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली (ETV BHARAT Reporter)

त्यांना मागच्या दारानं आमदार केलं : पुण्यातील रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. "रॅली बघून राज्याचं अर्ध मंत्रिमंडळ झोपणार नाही. या रॅलीनं महाराष्ट्राला ताकद दिली आहे. माझ्या कमरेला बेल्ट आणि हातात सलाईन आहे. मराठ्याच्या अंगावर यायची कोणाचीही हिंमत नाही. रॅली बघून सगळ्यांचे डोळेच फिरले आहेत. काहीना पक्ष आणि नेता मोठं करायचं आहे, पण मला समाज आणि पुढील पिढी मोठी करायची आहे. आज जे माझ्या विरोधात बोलत आहेत, त्यांना मागच्या दाराने आमदार केलं जात आहे," असं म्हणत जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला.

मी कुठेही मॅनेज झालो नाही : "29 तारखेच्या बैठकीत जर ठरलं की, निवडणूक लढवायचं तर मग आपण बघितलं आहे की, प्रत्येक मतदारसंघात खूप उमेदवार इच्छुक आहेत. मात्र, समाज ज्याला कुणाला उमेदवारी देईल त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे. मराठ्यांचं दुःख हे माझं दुःख असून, ज्यांनी त्रास दिला त्यांना पाडणार आहे. इथून पुढे गाफील राहायचं नाही, गद्दारी करायची नाही. आपण बघितलं असेल की आपलं आंदोलन मोडण्यासाठी खूप काही करण्यात आलं. मात्र, मी कुठेही मॅनेज झालो नाही आणि मॅनेज होणार देखील नाही. यामुळं त्यांच्या पुढे एकच पर्याय आहे, मला गोळ्या घालून मारणं. पण जो कोणी मारेल त्याची राज्यात जात शिल्लक राहणार नाही," असं म्हणत जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना इशारा दिला.

नेत्याला नाही तर समाज मोठा करायचा : "सरकारकडून महाराष्ट्रात दहशत पसरवली जात होती की, मराठा कधीच एकत्र येणार नाही. आपण इथ मराठ्यांची जात मोठी करण्यासाठी आलो आहोत. सोलापूर, सांगली, सातारा येथे मोठ्या प्रमाणात समाज एकत्र आला, पण कोल्हापूर येथे काही अडचणी होत्या म्हणून समाज एकत्र आला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात सापळा रचला. फडणवीस हे प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून बोलत आहेत. तुम्ही ज्या आमदारांना मोठं केलं तेच विरोधात बोलत आहेत. छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नेत्यांना एकत्र करत कट रचण्यात आला आणि मोठं संकट उभं करण्यात आलं. फडणवीस यांनी माझ्यावर एसआयटी देखील लावली. तरीही काही झालं नाही. आता नेत्याला नाही तर समाजाला मोठं करायचं," अशी साद जरांगे पाटील यांनी समाजाला घातली.

हेही वाचा -

  1. 'त्याला' सोडायचं नाही; मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना डिवचलं - Chhagan Bhujbal
  2. सरकारला बदनाम करणं हीच जरांगे पाटलांची भूमिका - राधाकृष्ण विखे पाटील - Vikhe Patil Criticized Sharad Pawar
  3. मनोज जरांगे पाटील 'महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री'; पुण्यातील शांतता रॅलीत झळकले पोस्टर - Manoj Jarange Future CM Posters

ABOUT THE AUTHOR

...view details