मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Election 2024) काँग्रेसनं पक्षाच्या 16 बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली. काँग्रेसनं रविवारी बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या 16 उमेदवारांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षानं बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
काँग्रेसच्या 16 बंडखोरांची हकालपट्टी; 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षातील 16 बंडखोर उमेदवारांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.
16 बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी (Source - ETV Bharat)
Published : Nov 10, 2024, 10:41 PM IST
|Updated : Nov 10, 2024, 10:59 PM IST
राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, आता काँग्रेसनं बंडखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. बंडखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असं काँग्रेस पक्षानं नुकतंच जाहीर केलं होतं.
Last Updated : Nov 10, 2024, 10:59 PM IST