महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"आम्ही सगळे एकत्रित बसू आणि..." बंडखोरीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

आमदार श्वेता महाले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चिखली येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी बंडखोरीवर मोठं विधान केलंय.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2024, 9:16 PM IST

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील आमदार श्वेता महाले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चिखली येथे आले होते. यावेळी महायुतीमध्ये होत असल्या बंडखोरीवर त्यांनी मोठं विधान केलंय. तसंच काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

श्वेता महाले यांनी अनेक विकासकामं केली :"श्वेता महाले यांनी या मतदारसंघात अनेक विकासकामं केली. गाव-शहरातील रस्त्यांबाबत, पिण्याच्या पाण्याची योजना, सिंचनाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या असतील प्रत्येक बाबतीत श्वेता यांनी या मतदारसंघात कामं केली आहेत. महाराष्ट्राच्या विधानमंडळानं उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांचा गौरव देखील केलाय. त्यामुळंच भाजपानं महायुतीच्या उमेदवार म्हणून श्वेता यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय. मला विश्वास आहे की, यावेळी त्या जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील," असं देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

बंडखोरीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान : "बंडखोरी रोखण्याकरीता आम्ही सगळे नेते एकत्रित बसू आणि जिथं जिथं ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी अर्ज भरला असेल, त्या त्या पक्षाचे लोक त्यांना अर्ज मागं घ्यायला लावतील. महायुती एक आहे, अधिकृत उमेदवार तोच आमचा उमेदवार आहे. जिथं कमळ दिलंय, तिथं कमळच आमचा उमेदवार आहे. जिथं धनुष्यबाण दिल, तिथं धनुष्यबाणच आमचा उमेदवार आहे आणि जिथं घड्याळ दिलं, तिथं घड्याळच आमचा उमेदवार आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देणार असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा

  1. ...अन् जितेंद्र आव्हाडांवर त्यांचाच नाराज कार्यकर्ता संतापला; भर रस्त्यात थांबवून केलं असं काही
  2. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर; अनिल देशमुखांच्या मुलाला उतरवलं रिंगणात
  3. आदित्य-अमित ठाकरे बंधू नातं जपणार आणि आमदारकीही मिळवणार, वरळीतून मनसे तर माहिममधून उबाठा घेणार माघार?

ABOUT THE AUTHOR

...view details