महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"मोदींच्या चेहऱ्यानं सर्व जागा जिंकू"; भाजपाच्या प्रचार रथाला मुंबईत सुरुवात

Ashish Shelar On BJP Prachar Rath : भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज मुंबईत प्रचार रथाचं उद्धाटन करण्यात आलं. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी रथाला हिरवा झेंडा दाखवला. सध्या तरी मुंबईत भाजपाने प्रचारात आघाडी घेतली असून चेहरा कोणीही असला तरी मोदींच्या चेहऱ्याने सर्व जागा जिंकू असा विश्वास यावेळी शेलार यांनी व्यक्त केलाय.

BJP Prachar Rath
भाजपाच्या प्रचार रथाला सुरूवात

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 9:23 PM IST

प्रतिक्रिया देताना आशिष शेलार

मुंबई Ashish Shelar On BJP Prachar Rath : मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते सहा डिजिटल प्रचार रथाला झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयाच्या आवारात प्रचार रथ शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डिजिटल प्रचार रथाच्या माध्यमातून मुंबईतील सहाही लोकसभा क्षेत्रातील मुंबईकरांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या विकासकामांची माहिती पोहोचवली जाणार असल्याची माहिती, शेलार यांनी दिली.


नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी मेहनत: मुंबईतील महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, अशा सर्व घटकांची संपर्क आणि संवाद साधण्याचं काम सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षानं केलं आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक पोलिंग स्टेशनवर सुपर वॉरिअरची सक्षम व्यवस्था उभी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता मेहनत घेत आहे. निवडणूक संचालन समितीची बैठका होत आहेत. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते झटून कामाला लागले आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक संचालन समितीच्या बैठका यशस्वी होत आहेत. योजनांच्या लाभार्थ्यांची संवाद साधला जात असल्याचं शेलार यांनी सांगितलं.


'अबकी बार चारसो पार' : मुंबईत शंभरहून अधिक ठिकाणी आधार कार्ड, मेडिकल चेकअप, डिजिटल इंडिया यासारखे उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत. अनुसूचित जाती-जमाती बांधवांसाठी भारतीय जनता पक्षानं काम केलंय. काम करणाऱ्या महिलांना वसतिगृह, युवकांशी, अल्पसंख्यांक बांधवांशी स्नेहसंवाद राबविण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीची पहिली यादी सुद्धा भारतीय जनता पक्षाने जाहीर केली. माहिती घटक पक्षांबरोबर प्रचाराला थेट सुरुवात म्हणून आजचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. एक करोड चाळीस लाख मुंबईकरांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांना पोहोचवण्याचा संकल्प मुंबई भारतीय जनता पार्टीने केला. दरम्यान सहा भाजपा जिल्हाध्यक्ष निवडणुकीचे संयोजक आहेत. नगरसेवक, पदाधिकारी स्थानिक पातळीवर सक्रिय आहेत. भारतीय जनता पक्षाने पाच वर्ष प्रामाणिकपणे जनतेची सेवा केलीय. म्हणूनच 'अबकी बार चारसो पार' असे आम्ही आत्मविश्वासानं म्हणत आहोत.


अन्य पक्षातली लोक स्वतःच्या पक्षात घेण्यात मर्दानगी: सध्या राजकारणात दुसऱ्याची पोर कडेवर घेऊन खेळवताय यावर आशिष शेलार म्हणाले की, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललं असावं असं मला वाटतंय. कारण उद्धव ठाकरे हे अन्य पक्षातली लोक स्वतःच्या पक्षात घेण्यात मर्दानगी मानत आहेत. म्हणून स्व पक्षातले कट्टर बाळासाहेबांच्या विचारांची लोकं ही त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना सोडून खऱ्या शिवसेनेत जात आहेत. आता उद्धव ठाकरे अन्य पक्षातून त्या ठिकाणी नाकारलेली लोकं घेत आहेत, म्हणून राज ठाकरे यांचा टोला उद्धव ठाकरे यांच्या दिशेने आहे.

हेही वाचा -

  1. देवेंद्र फडणवीसांनी दिले मनसेबरोबर युतीचे संकेत; म्हणाले, "भूमिका भाजपासारखीच"
  2. माझ्यावर झालेल्या संस्कारामुळं... ; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीबाबत सुळे यांची प्रतिक्रिया
  3. आमदार सतेज पाटलांच्यात इतका बालिशपणा आला कुठून; मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details