मुंबई : मराठी कलाविश्वामधील 'चंद्रमुखी' म्हणून ओळखल्या जाणारी अमृता खानविलकर आता चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर एका यूजर सुंदर उत्तर दिलं आहे. सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. काही स्टार्स इन्स्टाग्रामवर 'आस्क मी सेशन' लाइव्हमध्ये येऊन धमाल करताना दिसतात. अनेकदा चाहते त्याच्या आवडत्या कलाकारांना भन्नाट प्रश्न विचारून त्यांना विचारात पाडतात. आता असं काही अमृता खानविलकरबरोबर घडलं आहे. अमृता खानविलकरनं तिच्या इस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे.
अमृता खानविलकरनं लग्नाच्या प्रपोजलवर दिली प्रतिक्रिया : अमृता खानविलकरला तिच्या एका चाहत्यानं 'आस्क मी सेशन'मध्ये कमेंट करत थेट लग्नाची मागणी घातली होती. या यूजरनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'आय लव्ह यू, मला तुझ्याशी लग्न करण्याची खूप इच्छा आहे…प्लीज मला तुझा लाइफटाइम नवरा बनवशील का…प्लीज' यानंतर यावर अमृता उत्तर देताना लिहिलं, 'हॅलो इंडियन सुनील या ऑफरसाठी धन्यवाद, मात्र मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. जरी तुला माझा लाइफटाइम नवरा व्हायचं असेल तरीही नाही…खरंच सॉरी.' याचा स्क्रीनशॉट अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून आता चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अमृता खानविलकरचं वर्कफ्रंट : अमृता खानविलकरनं मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सुंदर अभिनयानं चाहत्यांच्या मनावर एक छाप पाडली आहे. तिनं अनेक मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे. याशिवाय ती एक सुंदर डान्सर देखील आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती आपल्या चाहत्यांच्या कमेंट्सवर देखील रिप्लाय देताना दिसते. तसेच अमृतानं दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली. दरम्यान अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अमेय वाघ आणि राजसी भावे यांच्यासह शेवटी 'लाइक अँड सब्सक्राइब' या चित्रपटात झळकली होती. याशिवाय तिचे आणखी काही चित्रपट चाहत्यांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.