ETV Bharat / state

सैफ अली खान हल्ला प्रकरण; डावकी नदीत पोहून घुसला भारतात, शरीफुल इस्लामचा कसा झाला 'विजय' ?, जाणून घ्या आरोपीची मोडस ऑपरेंडी - SAIF ALI KHAN ATTACK CASE

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानं बांगलादेशमधून भारतात घुसखोरी कशी केली, याबाबत माहिती दिली.

Saif Ali Khan Attack Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2025, 2:05 PM IST

Updated : Jan 22, 2025, 3:29 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या निवासस्थानात घुसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. मात्र मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं बांगलादेशातून भारतात येण्यासाठी डावकी नदीत तब्बल 200 मीटर पोहून घुसखोरी केली. घुसखोरी केल्यानंतर त्यानं कोलकातामधील एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत कागदपत्रं मिळवली. त्यानंतर विजय दास या नावानं त्यानं ठाण्यातील लेबर कॅम्प गाठला. मुंबई पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं भारतात कसा प्रवेश केला, इथपासून त्यानं कागदपत्रं कशी काढली, याबाबतची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.

डावकी नदीत 200 मीटर पोहून केली भारतात घुसखोरी : मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानं देशभरात खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, मुंबई पोलिसांकडं त्यानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बांगलादेशातून भारतात घुसखोरी करण्यासाठी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं बांगलादेश मेघालय सीमेवरुन घुसखोरी केली. मात्र ही घुसखोरी करताना त्यानं डावकी नदीत 200 मीटर पोहून तो भारतात घुसला.

कोलकाता इथं स्थानिकाच्या नावावर घेतलं सीमकार्ड : मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं भारतात घुसखोरी केल्यानंतर त्यानं कोलकाता इथं एका हॉटेलमध्ये काम मिळवलं. त्यानंतर त्यानं एका स्थानिकाच्या नावावर सीम कार्ड खरेदी केलं. त्या सीम कार्डचा वापर करुन त्यानं इतर सीम कार्ड खरेदी केली. याच सीमकार्डच्या माध्यमातून तो कुटुंबीयांच्या संपर्कात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. कोलकाता इथं त्यानं आपलं मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हे नाव लपवून विजय दास या नावानं तो वावरत होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुंबईत आल्यावर त्यानं एका स्थानिक कंत्राटदाराच्या माध्यमातून मुंबईत आणि काही काळ ठाण्यात काम केलं.

कोलकाताबाबत आरोपीला नाही माहिती : अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशचा असल्याचं उघड झालं. अगोदर त्यानं आपण बंगालचा असल्याचा दावा केला. मात्र मुंबई पोलिसांनी त्याच्याकडं कसून विचारपूस केली. सुरुवातीला तो बांगलादेशी असल्याचं सांगत नव्हता. त्याला कोलकाताबद्दल माहिती विचारल्यावर त्याला सांगता आली नाही. मात्र त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या अॅपच्या माध्यमातून तो त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. त्याच्या भावाशी संपर्क साधून त्याची प्रमाणपत्रं मागवण्यात आली आहेत. त्यामुळे त्याच्या बांगलादेशी असल्याच्या संशयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत मोठा हात मारुन बांगलादेशमध्ये पळून जाण्याची योजना : बांगलादेशातून भारतात घुसखोरी केल्यानंतर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये राहत होता. मुंबई पोलिसांनी त्याला ठाण्यातील लेबर कॅम्पमधून अटक केली. त्यानं उदर निर्वाहासाठी त्यानं हॉटेलमध्ये छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली. सैफ अली खानच्या घरात चोरी करण्यासाठी तो घुसला. त्यापूर्वी देखील तो छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता, असं पोलिसांच्या तपासात पुढं आलं आहे. मुंबईत आल्यानंतर त्यानं हॉटेलमध्ये काम केलं. आरोपीकडं पश्चिम बंगालचं सीम कार्ड होतं. त्याद्वारे तो कुटुंबीयांच्या संपर्कात होता. मुंबईत मोठा हात मारुन बांगलादेशमध्ये पळून जाण्याची त्याची योजना होती, असं पोलीस तपासात समोर आलं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; 19 ठिकाणांच्या फिंगरप्रिंटचा तपास सुरू
  2. अक्षय कुमारनं सैफ अली खानच्या साहसाचं केलं कौतुक, सलमानशी मतभेदावरही दिलं स्पष्टीकरण
  3. सैफ अली खान हल्ला प्रकरण: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कसा दिसला नाही शरीफुल इस्लाम, मुंबई पोलिसांच्या डोक्याला झाला ताप, कंट्रोल रुममध्ये...

Last Updated : Jan 22, 2025, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.