कोल्हापूर-महाविकास आघाडीच्या प्रचाराकरिता लोकसभेचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. उपमुख्यमंत्री म्हणाले, " राहुल गांधींभोवती अर्बन नक्षलवादी लोकांचा घोळका आहे. राहुल गांधींच्या अवतीभोवती अराजकता माजविणारे लोक आहेत."
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " भारत जोडोच्या नावाखाली समाजात अराजकता पसरवण्याचे काम सध्या सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हातात संविधानाचं लाल पुस्तक घेतात. संविधानाचा सन्मानच झाला पाहिजे. मात्र, हे लाल पुस्तक नेमकं कोणाकडे इशारा करत आहे? अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही. देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल, असं काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे."
संविधानाचा सन्मानच केला पाहिजे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. पुढे उपमुख्यमंत्री म्हणाले, " काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत यात्रा काढली. भारत जोडो समूहामध्ये सहभागी झालेल्या संघटना आहेत. त्या कट्टर डाव्या विचारायच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे आणि कामाची पद्धत बघितली तर समाजात अराजकता पसरवण्याचं काम करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण, मग लाल संविधान का? लाल संविधान दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ ऑर्डर आणि एनआरकेचा अर्थ असतो डिसऑर्डर! मग तुम्ही अराजक पसरवत आहात. त्यामुळे संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करत आहेत. समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम याठिकाणी होत आहे का?" असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकता रोपण करायचं. जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस