हैदराबाद WhatsApp Down : व्हॉट्सॲप डाऊन झाल्यामुळं एकच गोंधळ उडाला आहे. वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वेबवर काम करता येत नाहीय. याबाबत त्यांनी 'X' या सोशल मीडीयावर तक्रारी केल्या आहेत.
Am I the only one experiencing Whatsapp web problems or is it down globally?
— Tonny Etern (@TonnyEtern) November 25, 2024
व्हॉट्सॲप डाउन : व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन करताना समस्या येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. वापरकर्ते व्हॉट्सॲप वेबशी कनेक्ट करू शकत नसून संदेश पाठवण्यात अडचणी येत असल्याचं वापरकर्त्यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर याबाब अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.
Am I the only one experiencing Whatsapp web problems or is it down globally?
— Tonny Etern (@TonnyEtern) November 25, 2024
जागतिक स्तरावर WhatsApp आउटेज : जगभरातील WhatsApp वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन करताना अनेकांना समस्या येत आहेत. या समस्येमुळं WhatsApp वेबशी कनेक्ट करताना अडथळे येत आहेत. तसंच संदेश पाठवण्यात देखील अडचण निर्माण झालीय.
मेटाकडून प्रतिसाद नाही : याबाबतत व्हॉट्सॲपची कंपनी, मेटानं या समस्येबद्दल अद्याप काहीही काहीही माहिती दिलेली नाहीय. Downdetector वेबसाइट व्हॉट्सॲप काम करत नसल्याचं म्हटलं आहे. या वेबसाइटनुसार, सुमारे 57% व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना वेबवर समस्या येत आहेत, तर 35% लोकांना ॲपवर समस्या येत आहेत. अनेकांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर या समस्येबद्दल पोस्ट देखील केली आहे. फोनवर व्हॉट्सॲप चांगलं काम करत आहे. समस्या फक्त वेब आवृत्तीवर आहे. अशा परिस्थितीत फारशा तक्रारी होताना दिसत नाहीत. मात्र कार्यालयीन वापरकर्ते आणि व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हे वाचंलत का :