मुंबई Eknath Shinde On Rickshaw Taxi : राज्य सरकारनं ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी (Rickshaw Taxi Drivers) कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, जे रोज रोजंदारीवर काम करतात अशा गोर-गरिबांसाठी या कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात आलीय. तसेच राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंट करण्यात येईल. यासाठी जर्मनीसोबत आम्ही रोजगाराबाबत करार केला आहे. यात चार लाख तरुणांना तिथे रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
50 हजार रुपयांची तात्काळ मदत : पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या महामंडळामध्ये ज्याला दुखापत होईल, त्याला तात्काळ 50 हजार रुपये देण्याचा एक प्रावधान केलेला आहे. त्याचबरोबर ही जी काही आरोग्य विमा पॉलिसी आहे. ती आणखी विस्तृत बनविण्याचा देखील विचार आहे. यामध्ये हे चालक जेव्हा 65 वर्षाचे होऊन निवृत्त होतात. तसेच ते कामकाज करू शकत नाहीत किंवा गाडी चालवू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांना पुढचं भविष्य त्यांचं सुखकर होण्यासाठी 'एक ग्रॅज्युएटीची एक पॉलिसी' आम्ही करण्याचा विचार केला आहे. त्यामध्ये देखील त्याचा फायदा होईल. आज परिवहन विभागाने 50 कोटी रुपयांची तरतूद यामध्ये केली आहे.