ETV Bharat / politics

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडून महाविकास आघाडीला धोबीपछाड, 10 पैकी 9 जागांवर विजय - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार जाहीर झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 9 मतदारसंघात महायुतीनं विक्रमी विजय मिळवला आहे.

Maharashtra Assembly Election Results
आमदार अमल महाडिक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2024, 11:27 AM IST

कोल्हापूर : राज्यातील सर्वाधिक मतदान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीनं महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्याचं निकालावरून स्पष्ट झालं. जिल्ह्यातील सर्वच दहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेलं मताधिक्य पाहता लाडक्या बहिणींनी महायुतीला मतपेटीतून भरभरून मताचं दान दिलं. महाविकास आघाडीला जिल्ह्यातील एकही जागा जिंकता आली नाही. यामुळं महाविकास आघाडीचा गड असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची अवस्था 9-0 अशी झाली आहे. चंदगडच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची राजकीय ताकद : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची राजकीय ताकद राज्यभरात मोठी आहेत. सहकारावर चालणाऱ्या या राजकारणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इथल्या जनतेनं कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाठ राखण केली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महायुतीनं जिल्ह्यातील महाविकास आघाडीला क्लीन स्वीप देत 9-0 असा विजय मिळविला आहे.

प्रतिक्रिया देताना अमल महाडिक (ETV Bharat Reporter)

चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांची बाजी : आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे दिवंगत आमदार पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील, शिरोळमधून गणपतराव पाटील, हातकणंगले मधून राजू आवळे यांचाही पराभव झाला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक कुटुंब अशी कट्टर राजकीय स्पर्धकांमध्ये लढत झाली. या लढतीत महाडिक यांनी बाजी मारत ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव केला. तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं दोन जागा राखत अस्तित्व सिद्ध केलं. स्थानिक शाहू आघाडीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही शिरोळ मतदारसंघातून विजय संपादन केला. तर चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली.

लक्षवेधी कागलच्या रणांगणात मुश्रीफांचा षटकार : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे (एसपी) उमेदवार समरजित घाटगे विरुद्ध राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अशी लक्षवेधी लढत झाली. 26 फेऱ्यांमध्ये प्रत्येक फेरीत उत्कंठावर्धक मताधिक्य राखत हसन मुश्रीफ यांनी 26 व्या फेरी अखेर 12 हजार 33 मतांनी विजय मिळवला. तर ते सहाव्यांदा कागलचे आमदार म्हणून ते विधीमंडळात प्रतिनिधित्व करणार आहेत.

दक्षिणचं वारं फिरलं आणि अमल महाडिक दुसऱ्यांदा विजयी : ग्रामीण आणि शहरी असा विभागला गेलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महाडिक विरुद्ध पाटील अशा लढतीत यंदा हिंदुत्ववादी मते भारतीय जनता वळाल्यानं अमल महाडिक यांना विजय मिळाला. मतदार संघातील प्रलंबित राहिलेल्या पायाभूत सोयीसुविधा पूर्णत्वास नेणार असल्याचे दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं.

कोल्हापूर उत्तरचं शिवधनुष्य राजेश क्षीरसागर यांच्या हाती : ऐन माघारीच्या दिवशी शेवटच्या क्षणी उमेदवारी माघारी घेतल्यानंतर कोल्हापूरचा गड कोण काबीज करतो. याकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर विरुद्ध महायुतीचे राजेश क्षीरसागर यांच्या लढत झाली. मात्र, कोल्हापुरातील नामांकित पेठांमधून मताधिक्य मिळवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक राजेश क्षीरसागर यांनी विजय मिळविला.

राधानगरीत प्रकाश आबिटकरांची यांची हॅट्रिक : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल राधानगरी तीनवेळा आमदार म्हणून काम केलेल्या के.पी पाटील यांचा दारुण पराभव करत हॅट्रिक केली. पाटील यांचा आंबेडकरांनी सलग दुसऱ्यांदा पराभव केला. राधानगरी भुदरगड तालुक्यातील जनतेने मत रोपाने दाखवलेल्या प्रेमाने पुन्हा एकदा विकासगंगा राधानगरीत अनुवासा विश्वास नवनिर्वाचित आमदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. आबिटकर यांना 1 लाख 42 हजार 688 तर के.पी पाटील यांना 1 लाख 4 हजार 88 मते मिळाली, राधानगरीतून प्रकाश आबिटकर 38 हजार 22 मतांनी विजयी झाले".

चंदगडमधून अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांची बाजी : "सर्वात अधिक उमेदवार असलेल्या चंदगड विधानसभेतून अपक्ष उमेदवार विजश्री खेचून आणत आमदारकी मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राजेश पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर, अपक्ष उमेदवार अपी पाटील, मानसिंग खराटे असा अपक्षांचा भरणा असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातून 14 हजार 278 मतांनी विजय मिळवला, महायुतीला जिल्ह्यातील जागा मिळाल्या असून एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारल्याचं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालंय".

कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का : कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या आमदार सतेज पाटील यांना जिल्ह्यातील एकही जागा राखता आली नाही. आमदार पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचाही कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दारून पराभव झाला. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या उमेदवारीवरून झालेला वाद, विशाळगड प्रकरणावर काँग्रेसने घेतलेली भूमिका आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळं जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे महायुतीला केलेले मतदान यामुळं कधीकाळी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेला कोल्हापूर जिल्हा या निवडणुकीत काँग्रेसमुक्त झाला आहे.

हेही वाचा -

  1. किंगमेकर ठरण्याचा दावा करणाऱ्या पक्षांना शून्य जागा; वाचा, विधानसभेतील पक्षीय बलाबल
  2. नाशिकमध्ये महायुतीचाच डंका! शहरात भाजपा तर, ग्रामीणमध्ये 'दादांचीच' हवा
  3. विधानसभा निवडणुकीत कोण विजयी? पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.