नाशिक; कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ जेव्हा लग्नात मंगलाष्टक म्हणतात,तेव्हा चर्चा तर होणारच - NARAHIRI ZIRVAL CHANTS MANGALASHTAK
🎬 Watch Now: Feature Video
Published : 16 hours ago
नाशिक - राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी एका लग्न समारंभाला हजेरी लावली. यावेळी मान्यवरांनी वधूवरांना आशीर्वाद दिल्यानंतर गुरुजींनी मंगलाष्टके सुरू केली. यावेळी मंत्री झिरवाळ यांनी गुरुजींकडून माईक घेत तालासुरात मंगलाष्टक म्हणण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थित पाहुण्यांना सुखद धक्का बसला त्यांनी मंत्री महोदयांचं कौतुक केलं. कधी विदेशात जाऊन शेतकरी मराठी पेहराव परिधान करून आपलं साधेपण जपणारे, कधी जत्रेतल्या तमाशात ताल धरणारे, कधी डोंगऱ्या देव उत्सवात पावरी वाजवणारे, कधी हळदीच्या कार्यक्रमात बेधुंद होऊन नाचणारे आणि कधी टाळ मृदुंगावर हरिनामाच्या ठेक्यात नाचत गुंग होणारे अशा विविध कला अंगी असलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज पुन्हा एक नवं रूप दाखवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कादवा कारखाना संचालक बाळासाहेब जाधव यांच्या पुतणीच्या लग्न सोहळ्याला मंत्री झिरवाळ यांनी हजेरी लावली. यावेळी कॅबिनेट मंत्री असल्याचा कोणताही बडेजाव न दाखवता सर्वसामान्यांमध्ये सामील होणे हा झिरवाळांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू पुन्हा एकदा सर्वांना भावला.