ETV Bharat / state

अखेर लगेज बॅगेतील मृतदेहाचं गुढ उलगडलं; चार महिन्यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपीला हत्येप्रकरणी अटक - THANE CRIME NEWS

चार महिन्यापूर्वी कल्याण-नगर मार्गालगत एका बॅगेत सापडलेला वयोवृद्ध व्यक्तीच्या मृतदेहाचं गुढ उलगडलं आहे. ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं हत्या प्रकरणात मृत व्यक्तीच्या चुलतभावाला अटक केली.

Thane crime News
नौदल अधिकारी हत्या प्रकरण (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 15 hours ago

ठाणे : चार महिन्यांपूर्वी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वरप गावातील गावदेवी मैदानाच्या बाजूला असलेल्या कचरापट्टीत मृतदेह सापडला होता. मृत व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करण्यात ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे. या गुन्ह्यात अजयकुमार रघुनंदन मिश्रा (५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर त्याच्या १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं आहे.

  • मुकेश श्यामसुदंर कुमार (६२) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. ते मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी होते. त्यांना विष देऊन ठार मारत त्यांचा मृतदेह बॅगेत भरून फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

ठाणे गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कल्याण -मुरबाड मार्गावरील वरप गावात खुल्या भूखंडावर वृद्ध व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता. हा मृतदेह एका निळा रंगाच्या (लगेज) बॅगेत होता. भूखंडावर पसरलेल्या कचऱ्यात ही बॅग पडली होती. त्यावेळी लघुशंका करण्यासाठी आलेल्या तरुणाला ती बॅग दिसली. त्याने बॅग खोलली असता त्याला बॅगेत मृतदेह दिसताच धक्का बसला. त्यानं तात्काळ कल्याण ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खून करणे आणि पुरावा नष्ट करण्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं समांतर तपास सुरू केला.

पोलिसांनी कसा केला तपास?-मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील तसेच कल्याण- मुरबाड मार्गावरील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले होते. तसेच घटनास्थळाची श्वानपथक आणि ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं पाहणी केली. कल्याण तालुका ग्रामीण पोलीस पथकानं मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी समांतर तपास सुरुच ठेवला. चार महिन्यानंतर ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश साहिल यांना गुप्त मिळाली की, त्या सुटकेस (लगेज) बॅगमधील मृतदेह मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी कुमार यांचा आहे. ते कल्याण पश्चिम भागातील खडकपाडा भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहत होते. तर त्यांची मुलं विदेशात आहेत. ही माहिती मिळताच ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी पथकासह कुमार राहत असलेल्या सोसायटीत जाऊन खात्री केली. तेव्हा कुमार हे ११ ऑगस्टपासून घरी नसल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. बॅगमध्ये मृतदेह आढळून आलेल्या वरप गावात मुकेश श्यामसुदंर कुमार यांचे चुलत भाऊ आरोपी अजयकुमार रघुनंदन मिश्रा राहत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी वरप गावातून आरोपी अजयकुमार आणि त्याच्या १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले.

हत्येचं नेमकं कारण काय?-ताब्यात असलेल्या आरोपीकडं ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी केली. आरोपी चुलत भावाने ११ ऑगस्ट रोजी मृतक मुकेश यांना बहाण्यानं वरप येथील त्यांच्या घरी बोलवले. त्यानंतर विष देऊन त्यांची हत्या करण्यात आली. मृदेदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी बाप-लेकानं लगेज बॅगमध्ये मृतदेह भरून कल्याण - नगर मार्गालगतच्या वरप गावातील कचरापट्टीत फेकून दिल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. खळबळजनक बाब म्हणजे मुकेश यांची संपत्ती मिळविण्याच्या लालसेनं त्यांची हत्या केली असावा, असा कयास ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी वर्तविला आहे. त्या दिशेनं तपास सुरू आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी कल्याण तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. तर १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाला भिवंडी बालसुधारगृहात रवाना केलं आहे.

हेही वाचा-

  1. बीड सरपंच हत्या प्रकरणात राजकीय वातावरण तापलं, सुरेश धस आणि वाघमारे यांनी केली टीका
  2. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या हत्येप्रकरणी आरोपी पती-पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
  3. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच दिली त्यांच्या खुनाची सुपारी, कबुली दिल्यानंतर पोलिसांनी केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.