ETV Bharat / state

प्रयागराजमधील दुर्घटनेनं 2003 च्या नाशिकमधील कुंभमेळ्याच्या दुःखद आठवणींना उजाळा, काय घडलं होतं? - KUMBH MELA STAMPEDE HISTORY

प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याच्या दुर्घटनेनं नाशिकच्या 2003 च्या सिहस्थ कुंभमेळ्याच्या दुःखद आठवणींना उजाळा मिळाला आहे. त्यावेळी काय दुर्घटना घडली होती, वाचा सविस्तर.

Kumbh Mela stampede history
महाकुंभ मेळावा दुर्घटना (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2025, 8:27 AM IST

Updated : Jan 30, 2025, 10:26 AM IST

नाशिक- महाकुंभ मेळाव्यातील दुर्घटनेनंतर नाशिककरांना २००३ मधील सिंहस्थ कुभमेळ्याच्या दुर्घटनांचं स्मरण होऊ लागलं आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाचं काय झालं होतं?

जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव अशी ओळख असलेल्या महाकुंभ मेळाव्यात बुधवारी रात्री दोननंतर प्रयागराज येथील संगमावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिककरांची चिंता वाढली आहे. कारण, 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू असताना महाकुंभ मेळाव्यातील दुर्घटना घडली आहे. त्यामुळे नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी प्रशासनाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

प्रशासनानं चांगली तयारी करावी (Source- ETV Bharat Reporter)

नाशिकला पंचवटीतील सरदार चौकात 27 ऑगस्ट 2003 मध्ये शाही मिरवणूक निघाली. अरुंद मार्गावर चेंगराचेंगरी होऊन 29 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यात 26 महिलांचा समावेश होता. तर 118 भाविक जखमी झाले होते. प्रयागराजला घडलेल्या घटनेनं 22 वर्षांपूर्वी सिंहस्थात घडलेल्या दुर्घटनेचं अनेकांना स्मरण होत आहे. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिहस्थ कुंभमेळा भरतो. मात्र, 2003 साली कुंभमेळाच्या दुःखद आठवणी आजही नाशिककरांच्या मनातून जात नाहीत.

अरुंध मार्गावरून गेल्यानं घडली होती दुर्घटना- 2003 साली देश-विदेशातून भाविक नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यात आले होते. पहिले शाही स्नान संपून दुसऱ्या शाही स्नानासाठी साधू-महंत पंचवटीतील सरदार चौकातून गोदावरी नदीवर येत होते. हत्ती आणि घोड्यावर स्वार होऊन निघालेला साधू-महंताचा ताफा सरदार चौकातून मार्गस्थ होत असतानाच चेंगराचेंगरी झाली. वास्तविक हा मार्ग अरुंद असून स्थानिक प्रशासनानं येथून न जाण्याची सूचना दिली होती. मात्र, भाविकांच्या गर्दीत या सूचनेचा साधू-महंतांना विसर पडला. वाजत-गाजत साधू महंतांची स्वारी हत्ती- घोड्यावरून तिथून निघाली. यावेळी महंतांनी चांदीची नाणी आणि चॉकलेट्स उधळल्यानं ते घेण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली. त्या गर्दीत चेंगराचेंगरीची घटना होऊन अनेक भाविकांना प्राण गमवावा लागला होता.

चौकशीसाठी रमणी आयोगाची स्थापना- या घटनेची पुढे व्ही. रमणी आयोगामार्फत चौकशीही झाली होती. परंतु, दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या अनेक गोष्टी ठळकपणे पुढे येऊनही थेट कुणालाही दोषी ठरविण्यात आलं नाही. मात्र, याचे खापर पोलीस प्रशासनावर फोडलं गेल्याचं ठसवण्यात आलं. तत्कालीन पोलीस आयुक्त पी. टी. लोहार आणि उपायुक्त मकरंद रानडे, गावित यांच्या साक्षी आयोगासमोर नोंदविण्यात आल्या होत्या.

नाशिक प्रशासनाने काळजी घ्यावी- महंत अनिकेत शास्त्री देशपांडे म्हणाले," प्रयाग येथे कुंभमेळा दरम्यान झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. नाशिकमध्ये 2027 सिहस्थ कुंभमेळा होत आहे. या काळात नाशिकमध्ये लाखो साधू-महंतांबरोबर करोडो भाविक देशभरातून गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येणार आहेत. या अनुषंगानं प्रयगराजसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे."

6 हजार 900 कोटींचा आराखडा- नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला 2027 मध्ये 'सिंहस्थ कुंभमेळा' (Simhastha Kumbh Mela) होणार असल्यानं जिल्हाधिकारी तसंच महानगरपालिकेकडून तब्बल 6 हजार 900 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची योग्यपद्धतीनं अंमलबजावणी झाली तर नाशिक शहराचा कायापालट होऊन विकासाला गती मिळणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, चांगल्या प्रकारे नियोजन व्हावं, यासाठी नाशिक शहरात पाच हजार सीसीटीव्हींची नजर राहणार आहे.

हेही वाचा-

  1. महाकुंभ २०२५ मुळे देशात आजार पसरण्याची शक्यता; तज्ञांना चिंता
  2. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग, आगीत 20 ते 25 तंबू जळून खाक

Last Updated : Jan 30, 2025, 10:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.