पर्थ Yashasvi Jaiswal Creats History : इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालनं फलंदाजी करत अनेक विक्रम केले आहेत. भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालचं ऑस्ट्रेलियात पदार्पण खूपच खराब झालं होतं. पर्थ कसोटीतील पहिल्याच डावात जयस्वाल खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर जे घडलं त्याची नोंद आता इतिहासात झाली आहे. पहिल्या डावातील अपयशातून धडा घेत यशस्वी जैस्वालनं दुसऱ्या डावात स्फोटक फलंदाजी करत शानदार दीडशतक झळकावलं.
1⃣6⃣1⃣ Runs
— BCCI (@BCCI) November 24, 2024
2⃣9⃣7⃣ Balls
1⃣5⃣ Fours
3⃣ Sixes
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗞𝗡𝗢𝗖𝗞! 🙌 🙌
Well played, Yashasvi Jaiswal 👏 👏
Live ▶️ https://t.co/gTqS3UPruo#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/WfSbWkWDoI
47 वर्षांनंतर झाला पराक्रम : जैस्वालनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 205 चेंडूत शतक पूर्ण केलं. अशाप्रकारे, ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी सामना खेळताना शतक करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटी सामन्यात केवळ दोनच फलंदाजांनी शतक झळकावलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिली कसोटी खेळताना भारतीय फलंदाजानं शानदार शतक झळकावल्यानंतर 47 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात हे घडले आहे. याआधी सुनील गावस्कर यांनी 1977 मध्ये ब्रिस्बेन इथं खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. त्याच वेळी, हा पराक्रम पहिल्यांदा मोटागनहल्ली जयसिम्हा यांनी 1968 मध्ये केला होता.
𝗠𝗮𝗶𝗱𝗲𝗻 𝗧𝗲𝘀𝘁 𝗰𝗲𝗻𝘁𝘂𝗿𝘆 𝗶𝗻 𝗔𝘂𝘀𝘁𝗿𝗮𝗹𝗶𝗮 🔥
— BCCI (@BCCI) November 24, 2024
A very special moment early on Sunday morning in the Perth Test as the immensely talented @ybj_19 brings up his maiden Test 100 on Australian soil.
He registers his 4th Test ton 👏
Live -… pic.twitter.com/S1kn2sWI0z
जैस्वालनं केल्या 150 धावा : जैस्वालच्या शतकामुळं भारतीय संघानं पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत दुसऱ्या डावात एका विकेटच्या मोबदल्यात 275 धावा करत यजमान संघाविरुद्धची एकूण आघाडी 321 धावांपर्यंत वाढवली होती. भारतानं तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात एकमेव विकेट लोकेश राहुलच्या (77) रूपाने गमावली. उपाहारानंतरही जैस्वालचा शानदार खेळ सुरुच राहिला आणि त्यानं आपल्या 150 धावा पूर्ण केल्या. त्यानं 275 चेंडूत 150 धावांचा आकडा गाठला. अशाप्रकारे, त्यानं वयाच्या 23 वर्षापूर्वी कसोटीत सर्वाधिक 150+ धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जावेद मियांदाद, ग्रॅमी स्मिथ आणि सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत स्थान मिळवलं.
A memorable century for Yashasvi Jaiswal in his first Test on Australian soil 👏#WTC25 | Follow #AUSvIND live ➡ https://t.co/S9JXIoxvKC pic.twitter.com/hr9056M21T
— ICC (@ICC) November 24, 2024
23 वर्षापूर्वी कसोटीत सर्वाधिक 150+ धावा करणारे फलंदाज :
- 8 - डॉन ब्रॅडमन
- 4 - जावेद मियांदाद
- 4 - ग्रॅम स्मिथ
- 4 - सचिन तेंडुलकर
- 4- यशस्वी जैस्वाल*
इतकंच नाही तर पहिल्या 4 शतकांमध्ये 150 किंवा त्याहून अधिक धावा करणारा जयस्वाल कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथलाच ही कामगिरी करता आली होती. या विशेष क्लबमध्ये सामील होणारा जैस्वाल हा जगातील दुसरा आणि भारतातील पहिला फलंदाज ठरला आहे. उपाहारानंतर 161 धावांवर जयस्वाल मिचेल मार्शचा बळी ठरला.
💯 reasons (and counting) to celebrate for Yashasvi Jaiswal 😍#WTC25 | Follow #AUSvIND live ➡ https://t.co/Q8tuHTDzKU pic.twitter.com/rXV3dB84bc
— ICC (@ICC) November 24, 2024
यशस्वी जैस्वालची सर्व कसोटी शतकं :
171 - विरुद्ध वेस्ट इंडिज
209 - विरुद्ध इंग्लंड
214* - विरुद्ध इंग्लंड
161 - विरुद्ध ऑस्ट्रेलिया
कसोटीत भारतासाठी 150+ ची सर्वोच्च धावसंख्या (वयाच्या 22 व्या वर्षी) :
- 4 - यशस्वी जैस्वाल*
- 2 - सचिन तेंडुलकर
- 2 - विनोद कांबळी
हेही वाचा :