महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप; थेट देवेंद्र फडणवीसांकडं तक्रार - Chandrakant Patil - CHANDRAKANT PATIL

Chandrakant Patil : राज्यात 13 ऑक्टोबरनंतर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वच नेत्यांनी तिकीटासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली. मीच वरचढ हे दाखवण्यासाठी कोण आरोप करतंय, तर कोणी त्याला प्रत्युत्तर देतंय. आता खुद्द मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेते आरोप करत आहेत. वाचा सविस्तर बातमी....

Amol Balwadkar allegations on chandrakant patil
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील (Source : 'X' AC)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2024, 4:58 PM IST

पुणे Chandrakant Patil : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून, या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली. बुधवारी भाजपाकडून राज्यातील काही मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. पुण्यातील कोथरूड मतदारसंघाचे आमदार व राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी गंभीर आरोप केलेत. पुण्यातील पत्रकार भवन येथे माजी नगरसेवक तसंच कोथरूड मतदारसंघातील इच्छुक उमेदवार अमोल बालवडकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

चंद्रकांत पाटलांकडून होतोय अन्याय : "आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूड मतदारसंघातून भाजपाकडून इच्छुक असून, तशी तयारी देखील करत आहे. मात्र, असं असताना पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून माझ्यावर अन्याय केला जात असून, माझ्या कोणत्याही कार्यक्रमाला ते येत नाहीत. तसेच कोणत्याही पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याला येऊ दिलं जात नाही. मी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून मला पाटील यांच्याकडून बहिष्काराची वागणूक मिळत आहे," असा आरोप अमोल बालवडकर यांनी केलाय.

अमोल बालवडकर यांचा आरोप (Source : ETV Bharat Reporter)

फडणवीसांकडं केली तक्रार : तसंच बुधवारी झालेल्या पदाधिकारी यांच्या मतदान प्रक्रियेत बालवडकर यांचं नाव कोणीही टाकू नये, असं थेट पदाधिकाऱ्यांना सांगितलं जात होतं. याबाबत मी पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं तक्रार केली असल्याचं यावेळी अमोल बालवडकर यांनी सांगितलं.

दुजाभावाची वागणूक दिली : "भाजपाचा कार्यकर्ता हा निर्भिड असावा आणि पूर्वीपासून मी अन्याय, अत्याचार यावर आवाज उठवत आहे. बुधवारी पक्ष निरीक्षकांची बैठक होती. पक्षातील लोकशाही टिकली पाहिजे. परंतु अनेक कार्यकर्त्यांना अमोल बालवडकर आणी शाम देशपांडे यांचं नाव घेऊ नका, असा आदेश देण्यात आला. मी गेल्या 10 वर्षात पक्षासाठी प्रत्येक निवडणुकीत झोकून देऊन काम केले आहे. असं असताना देखील स्थानिक नेत्यांकडून दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनं इच्छा व्यक्त करणं गुन्हा आहे का?" असा सवाल विचारत अमोल बालवडकर यांनी संताप व्यक्त केला.

पक्षाविरोधात नाही तर...:"माझ्या सोशल मीडियावर कमेंट करण्यापासून कार्यक्रमाला जाऊ नका, असा दबाव मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून टाकला जात आहे. माझा आवाज दाबला जातोय. मी पक्षाच्या विरोधात नाही तर पक्षातील नेत्यांकडून जी वागणूक मला दिली जात आहे, त्या विरोधात लढत आहे," असं यावेळी बालवडकर यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्रात महायुती १७० पार करणार, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास, संजय राऊत यांच्यावर केली सडकून टीका - Chandrakant Patil
  2. कुणबी दाखला मिळवणं आता सोप्पं; कसं ते जाणून घ्या... - Chandrakant Patil On Reservation
  3. विधानसभेसाठी चंद्रकांत पाटलांना पक्षातूनच विरोध; 'या' नेत्यानं दिलं आव्हान - Kothrud Assembly Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details