ETV Bharat / politics

पश्चिम महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कागलचे माजी आमदार करणार भाजपा प्रवेश - KOLHAPUR POLITICS

शिवसेनेचे (उबाठा) नेते, माजी आमदार संजय घाटगे यांच्याबाबतचा राजकीय ट्विस्ट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय.

Kolhapur Politics, Shivsena UBT Leader and former mla Sanjay Ghatge will be join BJP,  said Dhanraj Ghatge
उद्धव ठाकरे, संजय घाटगे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2025, 7:22 AM IST

Updated : Jan 5, 2025, 7:30 AM IST

कोल्हापूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) विजय मिळवल्यानंतर भाजपाकडं मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेना (उबाठा) नेते, कागल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय घाटगे यांचा पक्षप्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय. त्यामुळं शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी पश्चिम महाराष्ट्रातून हा मोठा धक्का मानला जातोय.

संजय घाटगे यांची हसन मुश्रीफ यांना साथ : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात 1998 चा विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना पराभूत करत घाटगे यांनी बाजी मारली होती. त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014, 2019 यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल पाच वेळा हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांचा पराभव केला. शिवसेनेकडून चार वेळा तर रामदास आठवले, राजू शेट्टी यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीकडून एकदा घाटगे विधानसभेच्या रिंगणात होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (उबाठा) असतानाही माजी आमदार घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांची साथ देत त्यांच्या विजयामध्ये महत्त्वाचा वाटा उचलल्याचं बघायला मिळालं होतं.

धनराज घाटगे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

भाजपा प्रवेशाची ऑफर : संजय घाडगे यांचे सुपुत्र अंबरीष घाटगे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे संचालक आहेत. जिल्हा परिषदेत देखील अंबरीष यांनी प्रतिनिधित्व केलंय. अशातच अंबरीष घाटगे यांना भाजपाकडून ऑफर मिळाल्याचं सांगितलं जातंय. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नुकतीच घाडगे पिता-पुत्रांनी भेट घेतली. या भेटीत पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळं सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत (शरदचंद्र पवार) असलेले शाहू समूहाचे प्रमुख समरजीत घाटगे यांची मात्र गोची होणार आहे. तसंच त्यांची भाजपामध्ये परतण्याची दोर कायमची कापली जाणार आहे. घाटगे पिता-पुत्रांच्या या भूमिकेमुळं कागलच्या राजकारणाची समीकरणं बदलणार आहेत.

भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते संजय घाटगे आणि अंबरीष घाटगे यांच्या संपर्कात आहेत. घाटगे जर भाजपात गेले तर, येत्या निवडणुकीत याचा जिल्ह्याला आणि कागल तालुक्याला मोठा फायदा होईल. संजय घाटगे यांनी भाजपात यावं, असं स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत आहे.- धनराज घाटगे, माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती, गटप्रमुख संजय घाटगे गट

लोकसभा- विधानसभेत परस्पर विरोधी भूमिका : गत वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून कोल्हापूरचे शाहू महाराज रिंगणात उतरले होते. कोल्हापूरच्या राजघराण्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे कागलमधून घाटगे पिता-पुत्रांनी शाहू महाराजांचा प्रचार केला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या मागे घाटगे यांनी ताकद उभा केली होती. 4 महिन्याच्या अंतरानं झालेल्या दोन्ही निवडणुकीतील परस्पर विरोधी भूमिकेमुळं घाटगे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय.

...म्हणूनच सत्तेसोबत जाण्याचा निर्णय : गेली चार दशक कागलच्या राजकारणात निष्ठावंतांचा गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय घाटगे यांना कार्यकर्ते टिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे. त्यांच्या गटाकडील विविध सहकारी संस्था, दूध डेअऱ्या, गुळप्रक्रिया कारखाना, सहकारी पाणीपुरवठा संस्था यांच्यासह होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुत्र अंबरीष घाटगे यांना निवडून आणण्यासाठी सत्तेसोबत जाण्याची अपरिहार्यता स्विकारावी लागत आहे. भाजपासोबत जाण्यानं स्वाभिमानी कार्यकर्ते दुरावणार नाहीत. तसंच सत्तेचा वापर करून आपल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्नही संजय घाटगे करणार असल्याचं सांगितलं जातंय.

हेही वाचा -

  1. कागलचं राजकारण तापलं; हसन मुश्रीफांच्या 'त्या' टीकेला समरजितसिंह घाटगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, "निष्ठा विकून आल्यामुळं..."
  2. ईडीच्या भीतीनं पालकमंत्री पदासाठी हसन मुश्रीफ यांनी नात्यांचा सौदा केला: समरजीत घाटगेंचा हल्लाबोल - Samarjit Ghatge On Hasan Mushrif
  3. "महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही...", हसन मुश्रीफांना समरजित घाटगेंचं प्रत्युत्तर - Samarjeet Ghatge On Hasan Mushrif

Last Updated : Jan 5, 2025, 7:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.