महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

ठाण्यात होणार आनंद दिघे यांच्या दोन शिष्यांचा सामना... - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू मानले जाणारे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर ठाकरे गटाकडून याआधीच राजन विचारे यांना देखील ठाण्यातून उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळं ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या दोन शिष्यांचा सामना होणार आहे.

Anand Dighe
धर्मवीर आनंद दिघे

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 10:32 PM IST

प्रतिक्रिया देताना नरेश मस्के

ठाणे Lok Sabha Election 2024: आज शिंदे गटाकडून ठाण्याची लोकसभेची जागा जाहीर करण्यात आली असून ही जागा नरेश मस्के यांना देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून याआधीच राजन विचारे यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यात आलीय. राजन विचारे (Rajan Vichare) आणि नरेश मस्के (Naresh Mhaske) हे दोघेही आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. मात्र, नरेश मस्के हे शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि त्यांनी शिंदे गटात मुख्य प्रवक्ता म्हणून कामही केलं आहे.

नरेश मस्के, राजन विचारे दिघे यांचे शिष्य : आनंद दिघे म्हणजे ठाण्यात देव समजले जाणारे व्यक्तिमत्व. आनंद दिघे हे बाळासाहेबांचे शिष्य समजले जायचे. आनंद दिघे यांनी आयुष्य जगताना समाजसेवेचं काम करत अनेक कार्यकर्ते घडवले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहेत. त्यासोबत नरेश मस्के, राजन विचारे हे दोघे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यास शिंदे गटाकडून उशीर झाला असला तरी, एक सर्वसामान्य कार्यकर्ता असलेले नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

आनंद दिघे यांच्यासोबत केलं काम: नरेश मस्के यांनी आनंद दिघे यांच्यासोबत काम करून इथपर्यंतचा प्रवास केला आहे. म्हणून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेश मस्के यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आनंदाश्रमामध्ये आपल्या कामाला सुरुवात केली. पुढील 19 दिवसांमध्ये रणनीती आखत आनंदाश्रमामधून लोकसभेची लढाई लढवली जाणार आहे. यासाठी महायुती मनसे आणि इतर मित्र पक्षांची मदत देखील घेतली जाणार असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलंय.


दोन्ही उमेदवारांना मोठं करण्याचं केलं काम : ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनानं सर्वसामान्य कार्यकर्ता ते खासदार इथपर्यंतचा प्रवास केला आहे. आनंद दिघे यांच्या आदेशानेच राजन विचारे यांना ठाण्याचे महापौर बनवण्यात आलं होतं. नरेश मस्के यांनी देखील शालेय जीवनापासून आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनातच काम करत भारतीय विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी ते ठाण्याचे महापौर असा प्रवास केलाय. आता नरेश मस्के यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी या सर्व बाबींचा खुलासा "ईटीव्ही भारत' कडं केलाय.

हेही वाचा -

  1. ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरे घेणार सभा; उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्रीकांत शिंदे,नरेश म्हस्केंनी घेतले राज ठाकरेंचे आशीर्वाद - Lok Sabha Election 2024
  2. ठरलं तर! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचा 'हुकमी एक्का' लोकसभेच्या रिंगणात - Lok Sabha Election
  3. मोदी-शाहांच्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात स्वाऱ्या; महाराष्ट्र दिनानिमित्त संजय राऊतांची जहरी टीका - Sanjay Raut

ABOUT THE AUTHOR

...view details