मुंबई Loksabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला इशारा दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही. बारामती मधील जनता आता पवार कुटुंबीयांना कंटाळली आहे. त्यामुळं या लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार आहोत, असा इशारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संदर्भात शिवतारे यांनी अपशब्दही उच्चारले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी आपण पुन्हा एकदा लोकसभा (Loksabha Election)लढणार असल्याचं सांगून अजित पवार गटाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर : या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विजय शिवतारे यांच्या संदर्भात अपशब्द उच्चारले आणि कुणीही आगाऊपणा करण्याचा प्रयत्न करू नये. कुणी कुठून लढायचं याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, त्यामुळं शिवराळ शिवतारे यांनी आपल्या शब्दांना आणि भावनांना आवर घालावा असा सज्जड दम मिटकरी यांनी दिला आहे.