हैदराबाद : जपानी ऑटोमेकर होंडा कंपनीनं भारतीय बाजारात एलिव्हेट एसयूव्हीची ब्लॅक एडिशन जानेवारी 2025 मध्ये सादर केलीय. इंजिन, वैशिष्ट्ये आणि किंमतीच्या बाबतीत दोन्ही एसयूव्हीपैकी कोणती खरेदी करणे चांगलं असेल? चला जाणून घेऊया...
Honda Elevate vs Hyundai Creta Features
होंडाच्या एलिव्हेटच्या ब्लॅक एडिशनचा बाह्य आणि अंतर्गत भाग पूर्णपणे काळा ठेवण्यात आला आहे. याशिवाय, यात ब्लॅक रूफ रेल, फेंडरवर सिग्नेचर बॅज, टेलगेटवर ब्लॅक एडिशन बॅज, 17-इंच ग्लॉस ब्लॅक पेंट अलॉय व्हील्स, एलईडी डीआरएल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, पियानो ब्लॅक गार्निशसह स्पोर्टी ब्लॅक केबिन, ब्लॅक स्टिचिंगसह स्पोर्टी ब्लॅक सीट्स, 7 रंगांचे अँबियंट लाइट्स, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, कीलेस एंट्री, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, फॉलो मी होम लाइट्स, पूर्णपणे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पीएम 2.5 केबिन एअर प्युरिफायर, वायरलेस फोन चार्जर अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
Hyundai Creta दुसरीकडं, ह्युंदाई क्रेटाच्या नाईट एडिशनमध्ये, कंपनी 17-इंच अलॉय व्हील्स, एलईडी लाइट्स, एलईडी डीआरएल, नाईट बॅज, लाल ब्रेक कॅलिपर्स, बायकलर्ड रेड इन्सर्टसह ब्लॅक इंटीरियर, ब्लॅक लेदर अपहोल्स्ट्री, अँबियंट लाइट, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल झोन एसी, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, ड्रायव्हिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल मोड्स, स्टार्ट/स्टॉप करण्यासाठी कीलेस एन्स्ट्रस्ट-बटण, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स अशी वैशिष्ट्ये ऑफर करतेय.
Elevate vs Creta Safety Features
होंडा एलिव्हेटच्या ब्लॅक एडिशनमध्ये कंपनीनं 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, ब्रेक असिस्ट, हिल असिस्ट, पार्किंग सेन्सर, इमोबिलायझर आणि होंडा सेन्सिंग (एडीएएस) सारख्या अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत.
Creta ह्युंदाई क्रेटाच्या नाईट एडिशनमध्ये सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, ईएससी, व्हीएसएम, एचएसी, टीपीएमएस, आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज, ईएसएस, इमोबिलायझर, पार्किंग सेन्सर आणि एडीएएस सारख्या सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
Honda Elevate vs Hyundai Creta Engine
होंडा एलिव्हेटच्या ब्लॅक एडिशनमध्ये, कंपनी 1.5-लिटर आय-व्हीटेक इंजिन देते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय आहे. एसयूव्ही एका लिटर पेट्रोलमध्ये 16.92 किमी पर्यंत धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे.
Hyundai Creta Engine ह्युंदाई क्रेटाचं नाईट एडिशन अनेक प्रकारांमध्ये लॉंच झालंय. यात 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड, 1.5 लिटर टर्बो जीडीआय पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय आहे. त्याचं 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन एसयूव्हीला 115 पीएस पॉवर आणि 143.8 एनएम टॉर्क देतं. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि आयव्हीटी, ऑटोमॅटिक आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचे पर्याय दिले आहेत.
Honda Elevate vs Hyundai Creta Price
होंडा एलिव्हेटची ब्लॅक एडिशन कंपनीनं फक्त टॉप व्हेरिएंटमध्येच ऑफर केली आहे. या एडिशनच्या मॅन्युअल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 15.51 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच्या सीव्हीटी व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 16.73 लाख रुपये आहे.
Hyundai Creta Price त्याच वेळी क्रेटाच्या नाईट एडिशनची एक्स-शोरूम किंमत 14.61 लाख रुपयांपासून सुरू होते आणि या एडिशनच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 20.41 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
हे वाचलंत का :