ETV Bharat / state

राज्यातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पूर्णत्वास, दीड एकर जागेत गडकोट किल्ल्यांसारखी तटबंदी - SHIVAJI MAHARAJ TEMPLE NEWS

संपूर्ण देशात प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर भिवंडीत साकारले जात आहे. या मंदिराचं लोकार्पण आणि शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा १७ मार्चला होणार आहे.

chhatrapati shivaji maharaj first temple
छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 2:00 PM IST

ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा या ठिकाणी साकारले जात आहे. येत्या १७ मार्च रोजी शिवरायांच्या तिथीनुसार प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यासाठी भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी दिली. महाराजांचे हे मंदिर गडकोट किल्ल्यांसारखे दिसावे म्हणून दीड एकर जागेत उभारलेल्या मंदिराच्या भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे.

लॉकडाऊनच्या संकटामुळे मंदिराच्या कामाला उशीर- छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं भूमीपूजन ४ मार्च २०१८ मध्ये झाले होते. मात्र, मध्यंतरीच्या कोरोना काळातील लॉकडाऊनच्या संकटामुळे उशीर झाला. असे असले तरी अधिक जोमाने काम सुरू केले. हे मंदिर फक्त दर्शनस्थळ न बनता शक्तीपीठ असावे. महाराजांचे जीवन समाजातील सर्व वर्गासाठी प्रेरणादायी राहील, हे लक्षात घेऊन मंदिर उभारणीचा संकल्प केला होता, अशी माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्यातील पहिलं मंदिर (ETV Bharat Reporter)

मंदिरात सहा फूट उंचीची सिंहासनारूढ महाराजांची मूर्ती- मंदिराभोवती असलेल्या तटबंदीच्या खालील ३६ चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले आहेत. या चित्राची माहिती येथे भेट देणाऱ्या सर्वभाषिक शिवभक्तांना कळावी यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये चित्राखाली माहिती लिहण्यात येणार आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्ला यांची मूर्ती साकारणारे म्हैसूर येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुणयोगी राज यांच्या हातून अखंड कृष्णशिला काळ्या पाषाणातून सहा फूट उंचीची सिंहासनारूढ महाराजांची मूर्ती साकारण्यात आली आहे. या अखंड दगडातून साकारलेल्या या मूर्तीमधून चैतन्य कसे येईल, याची काळजी मूर्ती घडविताना घेतल्याची माहिती राजूभाऊ चौधरी यांनी दिली आहे.

शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण, वैदिक शिक्षण देण्याचा प्रयत्न - मंदिर परिसरात केवळ मंदिर नव्हे तर गुरुकुल पद्धतीनं शिक्षण देण्याची सुविधा आणि शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मनोदय आहे. गाभारा सभामंडप हा परिसर 2500 चौरस फूट क्षेत्राचा आहे. मंदिराची तटबंदी दीड एकर क्षेत्रात आहे. या ठिकाणी शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण आणि वैदिक शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास शिवक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त हभप कैलास महाराज नीचीते यांनी व्यक्त केला आहे.

असा असेल मंदिराचा लोकार्पण सोहळा- या मंदिराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त 12 ते 17 मार्च दरम्यान वैदिक आणि ब्राम्हण यांच्याकडून शास्त्रोक्त पूजा करून हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी गोपुजन, होम हवन, 108 हवनकुंड, वास्तूपुजन, त्यानंतर कलश पूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न होईल. तर सायंकाळच्या वेळी स्थानिक कलावंत यांचे सांस्कृतिक कार्यक्रम शिवचरित्र व्याख्यान, इतिहासकार आणि कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत, अशी माहिती किल्ले रायगड येथील शिवराज्यभिषेक राजपुरोहित प्रकाशस्वामी जंगम यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.