मुंबई - साऊथ कोरियमधील बँड बीटीएस सदस्य व्ही उर्फ किम तेह्युंग एका रोमांचक नवीन प्रोजेक्टसाठी सज्ज होत आहे. त्याच्या या प्रोजेक्टबद्दल अनेकजण उत्सुक आहेत. व्ही 2025च्या सुरुवातीला त्यांचे नवीन फोटोबुक रिलीज करणार असल्याची माहित होत आहे. गेल्या वर्षी त्याचा श्वान येओन्टानच्या मृत्यूनंतर तो खूप दु:खी झाला होता. दरम्यान जून 2025मध्ये केपॉप स्टार सैन्यातून निवृत्त होणार आहे. आता व्ही 'रेव' नावाचे एक फोटोबुक प्रकाशित करण्यास सज्ज आहे. या फोटोबुकमध्ये व्हीनं पॅरिसच्या मोहक शहरात घालवलेले सुंदर क्षण दाखविण्यात आले आहे. 12 जानेवारी रोजी बीटीएसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्वारे बिगहिट म्युझिकनं याची घोषणा केली होती.
व्ही उर्फ किम तेह्युंगचं फोटोबुक : 3 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारा 'रेव' शीर्षकचा फ्रेंचमध्ये अर्थ 'स्वप्न' असा होतो. बीटीएस ऑफिशयलनं शेअर केलेल्या पोस्टरमध्ये एकरंगी पॅरिसियन दृश्य दाखवले गेले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टरवर लिहिलं गेलं आहे, 'पॅरिसमध्ये जाणवलेले स्वातंत्र्य, एका क्षणाचे सौंदर्य, व्हीच्या डोळ्यांतून दिसणारे स्वप्नवत दृश्य, जे फोटोबुकचे कलात्मक सार टिपते.' चाहत्यांना त्यांच्या प्रती मिळवण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. 'रेव'च्या प्री-ऑर्डर 14 जानेवारीपासून उपलब्ध असेल (भारतीय वेळेनुसार सकाळी 7:30 वाजता) आणि 6 मार्च रोजी हे अधिकृतपणे प्रदर्शित होईल.
Rêvé, a dreamy journey that began when V set afoot in Paris.
— N ᴵ♡ᵁ ᶦᵗ'ˢ ˢᵒ ᵉᵃˢʸ (@TataLovesArt2) January 13, 2025
This photobook captures the special hours of freedom V spent in Paris, the city of romance.
V IS COMING
RÊVÉ BY V IS COMING#V #V_Rêvé pic.twitter.com/5u1YCfp8J1
V
— BTS_official (@bts_bighit) January 12, 2025Preview Poster
📅 Pre-order: 2025.01.14. 11AM (KST) ~
📅 Release: 2025.02.03. (KST)#V #뷔 #V_Rêvé pic.twitter.com/XCWV2LeJPA
पॅरिसमधील व्हीचे स्वप्नाळू क्षण : लक्झरी फॅशन हाऊस सेलिनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून, व्ही वारंवार पॅरिसला भेट देत असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर या शहरामधील घालवलेल्या क्षणाची झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. पॅरिसमधील व्हीचा खास आणि स्वप्नाळू क्षण, 'रेव'च्या माध्यामातून चाहत्यांना पाहायला मिळेल. 2024 मध्ये यशस्वी वर्षानंतर, 2025मध्ये व्हीचा हा प्रोजेक्ट पहिला आहे. गेल्या वर्षी, त्यानं विंटर अहेडबरोबर त्याच्या एकल गाण्याद्वारे पुनरागमन केलं होतं. यामध्ये बॅलेडियर पार्क ह्यो शिननं देखील सहकार्य केलं होतं. आता व्ही 'रेव'बरोबर, आपला कलात्मक प्रवास सुरू ठेवत आहे. किम तेह्युंगला फोटोग्राफी आणि कथाकथनाची आवड असून त्याचा दृष्टीतून बीटीएस आर्मीला देखील पाहायला मिळेल. या बहुप्रतीक्षित फोटोबुकमध्ये व्ही पॅरिसला कसं जिवंत करतो हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.