महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अजित पवारांना धक्का; रामराजे नाईक-निंबाळकर 'तुतारी' हाती घेणार! नेमकं कारण काय? - Ramraje naik nimbalkar News - RAMRAJE NAIK NIMBALKAR NEWS

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांचे निकटवर्तीय साताऱ्यातील नेते अजित पवारांसोबत गेले. मात्र, फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकरांनी भाजपा नेत्यांच्या त्रासामुळे पुन्हा स्वगृही परतण्याचे संकेत दिलेत.

Ramraje Naik Nimbalkar
रामराजे नाईक-निंबाळकर तुतारी हाती घेणार (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2024, 7:40 AM IST

Updated : Oct 6, 2024, 9:34 AM IST

सातारा- भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर अणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी माझ्यावर पुण्यात खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, असा सणसणाटी आरोप विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांनी जाहीर सभेत केला. तसेच अजित पवारांनी आपल्याला न विचारता फलटणचा उमेदवार जाहीर केला असे सांगत रामराजे यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविलीय.


रामराजेंच्या नाराजीचं नेमकं कारण काय?माजी जलसंपदा मंत्री आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे १९९५ ला आमदार झाले. तेव्हापासून २०१९ पर्यंत ते मंत्रिमंडळात होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर गेले. " विधानपरिषदेचे सभापती असतानादेखील मला तुरूंगात टाकायची तयारी रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरेंनी केली होती," असा गौप्यस्फोट रामराजेंनी जाहीर सभेत केला. "ही बाब मी देवेंद्र फडणवीसांनाही सांगितली होती. अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतरही भाजपानं निंबाळकर, गोरेंना समज दिली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आणि अस्वस्थ आहेत."

दमदाटी थांबवणार आहात की नाही? (Source- ETV Bharat Reporter)


सत्ता आपल्या कामाची नाही - "रामराजे लवकरच तुरूंगात जाणार आहेत, या अफवा कोण पसरवतंय? दमदाटी थांबवणार आहात की नाही?" असा सवालही रामराजेंनी अजित पवारांना केला. "सभेच्या अजेंड्यावर नसणारा विषय राज्यभर कसा गेला? याचा शोध मी पहिल्यांदा घेणार आहे. सत्तेत जावूनही असं होणार असेल तर सत्ता ही आपल्या कामाची नाही," असंही रामराजेंनी अप्रत्यक्षरित्या अजितदादांना ठणकावलं.

शरद पवारांना देव मानतो, तेवढंच-"मी शरद पवारांना देव मानतो. तेवढंच अजितदादांनाही मानतो. अजितदादांमधील गुण आणि भविष्याचा विचार करून आपण निर्णय घेतला. परंतु, माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंद जोपर्यंत सुरक्षित राहत नाही, तोपर्यंत आपलं महायुतीशी जमणार नाही," असंही रामराजेंनी सांगून टाकलं.

...तोपर्यंत अजितदादांना प्रश्न विचारणार-"दिल्लीत एक भारतीय जनता पार्टी आणि साताऱ्यात एक नवीनच भारतीय जनता पार्टी आहे. त्या पार्टीचं पिल्लू ज्याची माणमध्ये एक शाखा आणि फलटणमध्ये दुसरी शाखा आहे. त्यांना जोपर्यंत ताकद मिळतेय, तोपर्यंत आम्ही अजितदादांना प्रश्न विचारणारच," अशा शब्दांत रामराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ज्या माणसाला तुरूंगात टाकयला पाहिजे होतं, त्यांना पहिल्या यादीत तिकीट दिलं, याबद्दल मला भारतीय जनता पार्टीचं कौतुक वाटतं," असा उपरोधिक टोलाही रामराजेंनी मारला.

हेही वाचा-

  1. " माजी खासदारांची गल्लोगल्ली दहशत, तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही", रामराजे निंबाळकरांचा भाजपाला इशारा - Ramraje Nimbalkar On BJP
  2. 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये उकळले, भाजपा आमदार जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल - BJP MLA Jayakumar Gore
  3. रामराजे निंबाळकर यांच्या नाराजीवर आमची चर्चा सुरू, सर्वांनी एकत्र बसून सकारात्मक निर्णय घेऊ - अजित पवार - Lok Sabha Election 2024
Last Updated : Oct 6, 2024, 9:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details