ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'च्या प्रेक्षकांना मिळणार 'वाइल्ड फायर' ख्रिसमस भेट, अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा वाढणार रनटाइम? - PUSHPA 2 RUNTIME INCREASE

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी रसिकांना मनोरंजक भेट द्यायचं ठरवलं आहे. चित्रपटाचा रनटाइम वाढवला जाऊ शकतो अशी बातमी आहे.

Pushpa 2
पुष्पा 2 (Pushpa 2 poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 21, 2024, 7:38 PM IST

मुंबई - साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा अ‍ॅक्शन चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटानं भारतात 1000 कोटींचा टप्पा ओलांडला असताना, जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या या मोठ्या यशादरम्यान, निर्माते ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी चित्रपटप्रेमींना अनोखी भेट देण्याची योजना आखत आहेत. चित्रपटात काही नवीन दृश्यं जोडली जाऊ शकतात, अशी बातमी आहे.

'पुष्पा 2' चे निर्माते चित्रपटात 15 ते 20 मिनिटांचे अतिरिक्त फुटेज जोडण्याचा विचार करत आहेत, असं समजतंय. सध्या, चित्रपटाचा रनटाइम 200 मिनिटांचा आहे, म्हणजे 3 तास 20 मिनिटे इतका आहे. रनटाईम वाढीची बातमी खरी निघाल्यास परत एकदा अल्लू अर्जुनचे चाहते थिएटरमध्ये गर्दी करू शकतात.

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी X या सोशल मीडिया हँडलवर वरील संभाव्य निर्णयाचं कौतुक केलं आहे. त्यानं 'पुष्पा' चित्रपटाचे निर्माते मैत्री मुव्ही मेकर्सचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचं म्हटलंय. आपल्या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी लिहिले की, "अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' च्या आधीच 3 तास 20 मिनिटांचे फुटेज जोडणे आणि ते पुन्हा रिलीज करणे हा मैत्री मुव्ही मेकर्सचा एक मास्टर स्ट्रोक आहे."

दरम्यान अशा अफवा देखील आहेत की चित्रपटाच्या ओटीटी आवृत्तीमध्ये अतिरिक्त सामग्री समाविष्ट केली जाऊ शकते. या बातमीलाही अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ओटीटी रिलीजच्या अफवांवर मैत्री मुव्हीजनं प्रतिक्रिया दिली आहे. निर्मात्यांनी X वर लिहिले आहे की, ''पुष्पा 2 द रुलच्या ओटीटी रिलीजबद्दल अफवा उडत आहेत. या सर्वात मोठ्या सुट्टीचा हंगाम, फक्त मोठ्या पडद्यावर सर्वात मोठा चित्रपट 'पुष्पा 2' चा आनंद घ्या. हा चित्रपट 56 दिवसांपूर्वी कोणत्याही ओटीटीवर रिलीझ केला जाणार नाही. ही वाइल्ड फायर 'पुष्पा' फिल्म आहे जी जगभरातील फक्त थिएटरमध्ये आहे.''

'पुष्पा 2' नं भारतात 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. रश्मिका मंदान्ना, फहद फासिल आणि राव रमेश यांसारख्या दिग्गज कलाकारांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचं खूप कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.