शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे.. श्रद्धाचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलमधून झाले.. श्रद्धा कपूरचा हा क्लासमेट टायगर श्रॉफ होता.. शालेय शिक्षणानंतर श्रद्धा अमेरिकेत गेली.. पदवीसाठी तिनं बोस्टन विद्यापीठात प्रवेश केला.. श्रद्धा 16 वर्षांची होती. तेव्हा तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर आली होती.. अमेरिकेत श्रद्धा कपूरनं एका कॉफी शॉपमध्येही काम केलं आहे.. श्रद्धानं 'तीन पत्ती' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.. यानंतर तिनं 'लव्ह का द एंड' या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली.. श्रद्धाचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले.. सलग दोन फ्लॉपनंतर श्रद्धाच्या करिअरवर धोक्याचे ढग दाटून आले होते.. महेश भट्ट यांनी आशिकी 2 मध्ये श्रद्धाला संधी दिली. जो ब्लॉकबस्टर ठरला.