Health Benefits Of Beetroot: बीट खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनानं शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य राहते. तसंच बीटमुळे मेंदूचं कार्य देखील सुधारते. त्याचबरोबर चेहऱ्याला नैसर्गिक चमक प्रदान करण्यापासून ते चयापचय सुधारण्यासाठी आहारात बीटचा वापर केला पाहिजे. रक्तदाब, उच्चदाब देखील नियंत्रित राहण्यास बीट फायदेशीर आहे. बहुतेक लोक बीट भाज्यांमध्ये घालून खातात तर काही लोक सॅलड्स किंवा ज्यूस बनवून पितात. बीटमध्ये लोह, तांबे, व्हिटॅमिन सी, प्रथिने तसंच हे मॅग्नेशियमचं उत्कृष्ट स्त्रोत आहे.
- बीट खाण्याचे फायदे
- पचनासाठी चांगलं: बीटरुटमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. फायबर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहाण्यास मदत होते. फायबर पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करते. तसंच गॅस आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या टाळण्यास मदत होते.
- हृदयासाठी चांगले: बीटमध्ये असलेल्या नायट्रेटमुळे कमी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. हे रक्तवाहिन्या विस्तृत करते. ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवून या समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
- कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत: बीटमध्ये असलेल्या फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बीटमध्ये अँथोसायनिन नावाचा घटक आढळतो. जो हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतो. यामुळे नियमित बीटच सेवन केल्यास हृदयविकार टाळण्यास मदत होते.
- जळजळ कमी करण्यास मदत करते: बीटरूटमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरातील जळजळ कमी करण्यात प्रभावी भूमिका बजावतात. संधिवातासारख्या आजारांची लक्षणे कमी करण्यासाठी बीट खूप प्रभावी ठरू शकते.
- अँटी-कॅन्सर एजंट: बीटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. एवढेच नाही तर ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शनमुळे होणारे पेशींचे नुकसानही कमी करते. तसंच कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत होते. आहारात बीटचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे.
संदर्भ