महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

'या '5 इनडोअर ॲक्टिव्हिटीजसह मुलांबरोबर पावसाळ्यामध्ये करा धमाल - 5 INDOOR ACTIVITIES FOR KIDS - 5 INDOOR ACTIVITIES FOR KIDS

पावसाळ्याचे दिवसात मुलांचे मनोरंजन घरामध्ये झाले पाहिजे, असा प्रयत्न करणाऱ्या पालकांसाठी आज आम्ही काही विशेष घेऊन आलो आहोत. जेव्हा पाऊस येतो, तेव्हा मुलांना घरी बसून कंटाळा येत असतो आणि ते बाहेर खेळण्यासाठी देखील जाऊ शकत नाही. आता त्यांचे पावसाळ्याचे दिवस मजेदार जाऊ शकतात, त्यांच्याबरोबर खेळा हे काही रंजत खेळ. (ANI -photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 3:23 PM IST

इनडोअर ट्रेझर हंट हा मुलांना व्यग्र आणि सक्रिय ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. तुम्ही नकाशा तयार करा आणि काही वस्तू घरात लपवा, यानंतर त्या शोधा. (ANI -photo)
तुम्ही कागद, क्रेयॉन, मार्कर आणि गोंद यामधून सुंदर वस्तू तयार करण्यास मुलांना सांगा यामधून ते मग्न राहू शकतात. (ANI -photo)
आपल्या मुलांना बेकिंगद्वारे तुम्ही व्यग्र ठेऊ शकता. त्याच्याबरोबर केक तयार करून पाहू शकता. कुकीज, मफिन, कपकेक यासारख्या साध्या पाककृती निवडा. (ANI -photo)
तुमच्या लिव्हिंग रूमला इनडोअर कॅम्पसाइटमध्ये बदला. एक लहान तंबू सेट करा आणि ब्लँकेट आणि उशा वापरून एक किल्ला बनवा. हा खेळ देखील मुलांना आवडेल. (ANI -photo)
बोर्ड गेम्स, आणि पझल गेम पावसाळ्याच्या दिवसात मुलांचे मनोरंजन करण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे. (ANI -photo)

ABOUT THE AUTHOR

...view details