पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मोदी आणि यूएस' कार्यक्रमात प्रवासी भारतीयांना संबोधित केले.. हा कार्यक्रम न्यूयॉर्कमध्ये नासाउ कोलिजीयममध्ये पार पडला.. AI म्हणजे अमेरिका इंडिया ही जगाची नवीन शक्ती असल्याचं पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं.. पंतप्रधान मोदींनी आता आपले नमस्तेदेखील ग्लोबल झाल्याचं सांगितलं.. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रवासी भारतीयांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या महिलांनी घातलेल्या वेशभूषेनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं.. सर्व भारतीय हे राष्ट्रदूत असल्याचं सांगतं पंतप्रधानांनी प्रवासी भारतीयांचं कौतुक केलं.. अमेरिकन गायक फालू शाहनं यावेळी सादरीकरण केलं.. कार्यक्रमाला 15 हजारांहून अधिक प्रवासी भारतीय उपस्थित राहिले.. अनेक प्रवासी भारतीयांनी कार्यक्रमाच्या अनमोल आठवणी कॅमेरात कैद केल्याचं दिसून आलं.