'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा आज 6 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे.. नोराचा जन्म 6 फेब्रुवारी 1992 रोजी कॅनडात झाला.. डान्सर असण्यासोबतच नोरा एक मॉडेल देखील आहे.. मेहनतीच्या जोरावर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केले.. नोरा चित्रपटांपेक्षा जास्त गाण्यांमध्ये दिसली आहे.. नोरानं 'रोर: टायगर ऑफ द सुंदरबन्स' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.. नोराने 'रोर : टायगर ऑफ द सुंदरबन्स' चित्रपटात अप्रतिम काम केलंय.. यानंतर नोराला चित्रपटामधील अनेक ऑफर्स येऊ लागल्या.. नोरा रिॲलिटी शो 'बिग बॉस'च्या सीझन नऊमध्ये देखील दिसली होती.. बिग बॉस शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.. नोरा 'झलक दिखला जा' या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती.. या रिॲलिटी शोमध्ये जबरदस्त डान्स मूव्ह्सनं तिनं जगाला वेड लावले.. करिअरच्या सुरुवातीच्या काळात नोरा लॉटरीची तिकिटे विकायची.