महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

पुष्पा 2 सह 'हे' साऊथ चित्रपट 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी सज्ज; पाहा फोटो - ThangalanBagheera

आगामी साऊथ फिल्म्स 2024 Upcoming South Films 2024 : दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतील अनेक जबरदस्त चित्रपट या वर्षी धमाल करण्यासाठी सज्ज आहेत. या यादीत ज्युनियर एनटीआरच्या देवरासोबत अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 देखील आहे. प्रेक्षक या चित्रपटांची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 10:41 PM IST

अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट पुष्पा-2 यावर्षी 15 ऑगस्टला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
आरआरआर अभिनेता ज्युनियर एनटीआरचा देवरा चित्रपट कोरटाला सिवा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
शिव दिग्दर्शित आणि सूर्या अभिनीत 'कंगुवा' या चित्रपटात दिशा पटानी देखील मुख्य भूमिकेत आहे.
कार्तिक गट्टामनेनी लिखित आणि दिग्दर्शित 'ईगल' चित्रपटात रवी तेजा मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक शंकर यांच्या 'गेम चेंजर' या चित्रपटात कियारा अडवाणीसोबत राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'ब्रह्मयुगम' या हॉरर थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल सदाशिवन यांनी केलं आहे. या चित्रपटात मामूटी मुख्य भूमिकेत आहे.
पा. रंजित दिग्दर्शित, 'थंगालन'मध्ये मुख्य अभिनेता म्हणून चियान विक्रम आहे. हा चित्रपट 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
बघीरा चित्रपटाचं दिग्दर्शन सुरी यांनी केलं आहे. चित्रपटाचं लेखक प्रशांत नील आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details