हंसिका मोटवानीनं टीव्ही शोमधून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.. हंसिका मोटवानीची पहिली टीव्ही मालिका 'शका लाका बूम-बूम' होती.. त्यानंतर तिनं 'किस देश में निकला होगा चांद'मध्ये काम केलं.. 2003 मध्ये तब्बूच्या 'हवा' चित्रपटात ती दिसली. ज्यामध्ये तिनं साशाची भूमिका केली होती.. या चित्रपटानंतर हंसिका हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'कोई मिल गया' मध्ये दिसली.. लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करणारी हंसिका मोटवानी वयाच्या १५ व्या वर्षी साऊथ चित्रपटांकडे वळली.. तिनं पुरी जगन्नाध यांच्या तेलुगू चित्रपट 'देशमुदुरु'मध्ये काम केलं.. हंसिकाला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कारानं गौरविण्यात आलं.. यानंतर ती हिमेश रेशमियाबरोबर 'आप का सुरूर' चित्रपटात दिसली होती.. हंसिका मोटवानीनं आजपर्यत 60 हून अधिक चित्रपट केले आहेत.. हंसिकानं 2022 मध्ये बिझनेसमॅन सोहेल खातुरियाबरोबर लग्न केलं.. हंसिकाचे इंस्टाग्राम 6.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.