अभिनेता आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता बिर्जे यांनी आज मतदान करून आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.. गायक अनूप जलोटानं मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय.. अभिनेता मनोज बाजपेयी मुंबई मतदान केंद्रावर स्पॉट झाला. त्यानं आपल्या मतदानाचा हक्क बजावला.. अभिनेता गोविंदान मतदान केंद्रावर जाऊन आपला लोकशाहीचा हक्क बजावला आहे . आता त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.. अभिनेता धर्मेंद्र यांनी मुंबईत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांची पत्नी आणि हेमा मालिनी. तिची मुलगी ईशा देओल यांनी मतदान केलंय.. अभिनेता नाना पाटेकरनं मतदानाचा हक्क बजावला असून त्यांनी लोकशाहीविषयी जनजागृती यावेळी केली.