महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

पाहा 'पटाखा' गर्ल राधिका मदनचे आकर्षक फोटो

Radhika Madan Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री राधिका मदन तिच्या धमाकेदार अभिनयासाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीला टीव्ही मालिकेतून सुरुवात केली. या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या राधिकाला बी-टाऊनमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिले नाही.

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 10:21 AM IST

राधिका मदननं 2014 मध्ये 'मेरी आशिकी तुमसे ही' या टीव्ही शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
या मालिकेसाठी राधिकाला २०१५ मध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा 'झी गोल्ड' अवॉर्ड मिळाला होता.
या टीव्ही शोनंतर राधिकानं 2018 मध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या 'पटाखा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
राधिकाला 'पटाखा' या चित्रपटासाठी 'स्टार स्क्रीन' अवॉर्ड मिळाला होता. यानंतर 2018 मध्येच राधिकानं 'मर्द को दर्द नहीं होता' चित्रपटामध्ये काम केलं.
राधिकाला 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी 2021 साली 'दादासाहेब फाळके' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
याशिवाय 2022 मध्येही राधिकाला 'दादासाहेब फाळके पीपल्स बेस्ट चॉइस' अवॉर्ड देण्यात आला होता.
राधिका एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली डान्सर आहे.
अभिनय कारकिर्दीपूर्वी 2006 मध्ये राधिकानं 'झलक दिखला जा' या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती.
आता राधिकानेही ओटीटीवर पदार्पण केले आहे. 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'रे' या वेब सीरीजमध्ये तिनं काम केलं आहे.
राधिका 'मर्द को दर्द नहीं होता', ''शिद्दत', 'अंग्रेजी मीडियम' आणि 'मोनिका ओ माय डार्लिंग' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
राधिकानं टीव्ही इंडस्ट्रीच्या वर्किंग कल्चरबाबत एक विधान केलं होतं, ज्यानंतर एकता कपूर आणि अनेक सेलिब्रिटी तिच्यावर नाराज झाले होते.
राधिकानं 'नी जाना' या म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे. तिचा हा अल्बम तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details