महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

विदेशात नोकरी शोधत असाल तर सावधान! रशियात गेलेल्या तरुणाचा युक्रेन विरोधातील लढाईत मृत्यू - Russia is at war with Ukraine

Russia Ukraine war : रशिया-युक्रेन युद्धात रशियाकडून अनेक भाडोत्री सैनिकांचा वापर होत असल्याचं दिसून आलं आहे. रशियात कामासाठी गेलेल्या हैदराबादमधील तरुणाची युक्रेनमध्ये हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद अफसान (वय 30) असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण नोकरीच्या शोधात रशियाला गेला होता. पण तिथं नोकरीचं आमिष दाखवून त्याला रशियन सैन्यात भरती करण्यात आलं.

Russia Ukraine war
Russia Ukraine war

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 9:29 AM IST

नवी दिल्लीRussia Ukraine war : युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात रशियाच्या बाजूनं लढताना हैदराबादच्या बाजारघाट, नामपल्ली भागातील मोहम्मद अफसान (30) नावाच्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. याबाबत अफसानचा भाऊ इम्राननं सांगितलं की, त्याला रशियातील भारतीय दूतावासातून भावाच्या मृत्यूबाबात फोन आला.

आम्हाला मोहम्मद अफसान नावाच्या भारतीय तरुणाच्या मृत्यूची दुर्दैवी माहिती मिळाली असून आम्ही या तरुणाच्या कुटुंबाच्या तसेच रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही या तरुणाचा मृतदेह भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. - भारतीय दूतावास, रशिया

मृतदेह भारतात पाठवण्याचा प्रयत्न :याबाबत परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, सुमारे 20 भारतीय हे रशियन सैन्यात सपोर्ट स्टाफ काम करत आहेत. त्या सर्वांची सुटका करून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात तीन हैदराबादच्या तरुणांचा समावेश आहे. यावर एमआयएमचे प्रमुख, तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या तिघांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला यापूर्वी पत्र लिहिलं होतं. तरुणाच्या मृत्यूबाबत मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. दुसरीकडं, मोहम्मद अफसानच्या कुटुंबीयांनी मृतदेह हैदराबादला आणण्यासाठी मदतीसाठी एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्याशी संपर्क साधलाय.

दिशाभूल करून केलं सैन्यात भरती :अफसानचा भाऊ इम्राननं सांगितलं की, "मुंबईतील एजंट्सच्या मदतीनं अफसान प्रथम दुबईला पोहोचला होता. तेथून एजंट त्याला मॉस्कोला घेऊन गेला. तिथं अफसाननं काही कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. त्यानंतर त्याला रशियन सैन्यात स्लीपर म्हणून भरती करण्यात आलं. केंद्र सरकारनं माझ्या भावाचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणावा," असं इम्रान म्हणाला. अफसानची दिशाभूल करून त्याला सैन्यात भरती करणाऱ्या एजंटांवर सरकारनं कारवाई करावी, अशी मागणी इम्राननं केलीय.

बेरोजगार तरुणांना भरतीचं आमिष :बीआरएस नेते केटीआर यांनीही अफसानच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली. मृत अफसानच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. त्यांनी आपल्या एक्स मीडियातील पोस्टमध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्याचं सरकारला आवाहन केलं आहे. रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी रशियानं जगभरातील बेरोजगार तरुणांना सैन्यदलात भरती करण्याचं आमिष दाखवलं. रशियातील युद्धात लढणाऱ्या या तरुणांची भारतीय अधिकाऱ्यांनी सुटका करावी, अशी मागणी या तरुणांच्या कुटुंबीयांनी केली.

हे वाचलंत का :

  1. Russia Wagner Rebellion : पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यात करार...वॅगनरच्या बॉसने कोणत्या अटींवर दर्शवली सहमती? जाणून घ्या
  2. India To Buy Russian, American Missile : भारत अमेरिका, रशियाकडून खरेदी करणार क्षेपणास्त्र; संरक्षण दलाचा प्रस्ताव
  3. Iran to buy Russias Sukhoi Jets: इराण- रशियात मोठा लढाऊ विमान सौदा, सुखोई एसयू-३५ जेट्सची करणार खरेदी

ABOUT THE AUTHOR

...view details