महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

किम जोंग यांनी वाढविला तणाव! दक्षिण कोरियानं डिवचल्यानंतर घेतली क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी - क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी रविवार (28 जानेवारीः पाणबुडीवरून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीची पाहणी केली. तसंच, त्यांनी पाणबुडी बांधणी प्रकल्पाचाही आढावा घेतला.

North Korean leader Kim Jong Un
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन

By PTI

Published : Jan 29, 2024, 9:44 AM IST

नवी दिल्ली : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी पाणबुडीवरून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीची पाहणी केली. क्रूझ क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर पुलवासल-3-31 या क्रूझ क्षेपणास्त्राने पूर्व समुद्रात 7,421 सेकंद आणि 7,442 सेकंदात उड्डाण केलं. तसंच, निर्धारित जे लक्ष होतं त्यावर अचूक माराही केला.

उत्तर कोरियाने पुलवासल -3-31 लाँच केलं : दक्षिण कोरियाच्या स्थानिक माध्यमांनी सांगितलं की, पाणबुडीवरून प्रक्षेपित केल्यानंतर पुलवासल-3-31 या क्रूझ क्षेपणास्त्राने पूर्व समुद्रात 7,421 सेकंद आणि 7,442 सेकंदात उड्डाण केलं. यासोबतच निर्धारित लक्ष्यांवर अचूक माराही करण्यात आला. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही विशेष माहिती देण्यात आलेली नाही. दक्षिण कोरियाच्या सैन्यदलानं सांगितले की, उत्तर कोरियानं रविवारी सकाळी 8 वाजता पूर्वेकडील शिनपो बंदराजवळ अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याचं आढळलं आहे.

किम जोंग उन यांच्याशी चर्चा : पुलवासल-3-31 हे एक नवीन क्रूझ क्षेपणास्त्र आहे. याची उत्तर कोरियानं बुधवारी प्रथमच चाचणी केली. हे क्षेपणास्त्र पाणबुडीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र असल्याचा खुलासा उत्तर कोरियानं केला आहे. दरम्यान, हुकूमशहा किम जोंग-उन म्हणाले, 'नौदलाची अण्वस्त्रे तयार करणं हे तातडीचे काम आहे. ते देशाची आण्विक सामरिक शक्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.' अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या आणि इतर युद्धनौका बांधण्याच्या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली आहे.

राखाडी-पांढरे ढग तयार झाले : दक्षिण कोरियाच्या सैन्यानं सांगितल की, उत्तर कोरियाने सिन्पोच्या पूर्वेकडील बंदराजवळील पाण्यावर अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याचं आढळलं. उत्तरेकडे पाणबुडी विकसित करणारी प्रमुख शिपयार्ड आहे. युनायटेड स्टेट्स, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्याशी वाढत्या तणावादरम्यान उत्तर कोरियानं केलेल्या शस्त्रास्त्रांच्या प्रात्यक्षिकांमधील ही मोठी घटना आहे. दरम्यान, उत्तर कोरियाचं अधिकृत माध्यम असलेल्या रोडॉन्ग सिनमूननं किमान दोन क्षेपणास्त्रं स्वतंत्रपणं डागल्याचं फोटो प्रकाशित केलेत. दोन्ही क्षेपणास्त्रांनी सुमारे 45 अंशांच्या कोनात हवेत वाढल्यानं राखाडी-पांढरे ढग तयार केले. कदाचित ही क्षेपणास्त्रे टॉर्पेडो लाँच ट्यूबमधून उडवले गेले असावे असं प्रथमदर्शनी दिसून येतंय.

ABOUT THE AUTHOR

...view details