महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

नेपाळमध्ये नदीत बस कोसळून जळगावमधील 27 यात्रेकरुंचा मृत्यू, रक्षा खडसे उद्या जखमींची घेणार भेट - Indian Bus Plunges River in Nepal - INDIAN BUS PLUNGES RIVER IN NEPAL

Indian Passenger Bus Plunges River in Nepal : नेपाळमधील तानाहून जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात एक भारतीय प्रवासी बस मर्स्यांगडी नदीत कोसळली. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिलाय. या अपघातात जवळपास 27 प्रवाशांचा मृत्यू झालाय. हे प्रवासी महाराष्ट्रातील भुसावळ येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर येत आहे.

Indian Passenger Bus Plunges River in Nepal
भारतीय बस नेपाळमधील नदीत कोसळली (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 1:22 PM IST

Updated : Aug 23, 2024, 7:36 PM IST

काठमांडू(नेपाळ) Indian Passenger Bus Plunges River in Nepal : मध्य नेपाळमधील मार्स्यांगडी नदीत शुक्रवारी भारतीय प्रवासी बस कोसळली. या भीषण अपघातात जवळपास 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तानाहून जिल्हा पोलीस कार्यालयाचे डीएसपी दीपकुमार राय यांनी माहिती दिली की, यूपी एफटी 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळली.

बस नेपाळमधील नदीत कोसळली (Source ETV Bharat)

बस गोरखपूरच्या केसरवाणी ट्रॅव्हल एजन्सीची असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 43 प्रवासी म्हणजे सर्व जण महाराष्ट्रातील भुसावळ येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर 16 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. प्रवाशांनी अलाहाबाद रेल्वे स्थानकावरून प्रवास सुरू केला. त्यानंतर ही बस चित्रकूट धाममार्गे अयोध्येला गेली होती. तेथून काठमांडूला जात असताना हा अपघात घडला. यात्रेकरुंच्या तिन्ही बसमध्ये 110 प्रवासी होते. त्यापैकी 42 प्रवासी असलेल्या बसचा अपघात झाला.

उर्वरित लोक नेपाळमधील लुम्बिनीमध्ये-जिल्हा आपत्ती व्यवस्थापक गौतम गुप्ता यांनी सांगितले की, ही गोरखपूरच्या केसरवाणी ट्रान्सपोर्टची बस होती. 'पांडुरंग यात्रा' या नावाने एक यात्रा सुरू करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील 110 लोक प्रयागराज, अयोध्या मार्गे नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनाकरिता जात होते. त्यापैकी एका बसला अपघात झाला आहे. उर्वरित लोक सध्या नेपाळमधील लुम्बिनी येथे आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात, यूपीच्या मदत आयुक्तांनी सांगितले की, मृतांमध्ये यूपीमधील एखाद्या व्यक्तीचा समावेश आहे की नाही, ही माहिती समोर आलेली नाही. एका अधिकाऱ्याला नेपाळला पाठवले जात आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची माहिती (Source ETV Bharat)

नेमका कुठे झाला अपघात? प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस शुक्रवारी पोखराहून काठमांडूला जात होती. अचानक नेपाळमधील तानाहुन येथील अबुखैरेनी येथे मर्स्यांगडी नदीत बस कोसळली. नेपाळच्या मर्स्यांगडी अंबुखैरेनी ग्रामीण नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक २ मध्ये असलेल्या ऐन पहाराजवळ बस नदीत कोसळली आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी अपघातस्थळी पोहोचले आहेत. अपघाताबाबत सैन्यदल आणि सशस्त्र दलांना माहिती देण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे.

सर्व प्रवासी महाराष्ट्रातील भुसावळचे रहिवासी आहेत. त्यांना अलाहाबादहून बसमध्ये घेण्यात आले. तेथून सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला निघाले. बसचालक मुस्तफा यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही-ट्रॅव्हल एजन्सीचे मालक विष्णू केसरवाणी

  • उत्तर प्रदेशातील बस नदीत कोसळली : "नदीत कोसळलेल्या बसमध्ये 40 प्रवासी होते. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली. यात उत्तर प्रदेशचे प्रवासी किती होते याबाबत अजून तरी माहिती मिळाली नाही. मदतीसाठी आम्ही एक क्रमांक जारी केला आहे," अशी माहिती उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्तांनी दिली.
  • नेपाळ सैन्याकडून मदतकार्य : काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हेलिपॅडवरून वैद्यकीय पथकाला घेऊन नेपाळ सैन्याचं MI-17 हेलिकॉप्टर घटनास्थळी गेलंय. सध्या मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती नेपाळ सैन्याच्या कम्युनिकेशन विभागानं दिली.

16 जणांचा मृत्यू, 16 जखमी तर 11 जण बेपत्तामदतकार्यातील पथकाच्या माहितीनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत 16 जणांचे मृतदेह घटनास्थळावरून काढण्यात आले होते. घटनास्थळावरून 15 जखमींना बाहेर काढण्यात आले. तनहूचे डीएसपी दीपक कुमार राय यांनी सांगितले, बचावकार्य सुरू असून मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते. बसमध्ये चालक आणि सहचालकासह 43 जण होते. उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलिसांच्या मदतीनं 10 गोताखोरांना नदीत सोडण्यात आले आहे. जखमी प्रवाशांच्या उपचारासाठी सैन्यदलाचे हेलिकॉप्टर वैद्यकीय पथकासह काठमांडूहून रवाना झाले. कास्कीचे पोलीस प्रमुख मोहन थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेकरुंचा नेपाळमधील पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये मुक्काम होता. बुधवारी आणि गुरुवारी ते रिसॉर्टमध्ये मुक्काम करून शुक्रवारी सकाळी काठमांडूला रवाना झाले.

Last Updated : Aug 23, 2024, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details