ETV Bharat / international

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो राजीनामा देण्याची शक्यता; हे आहे कारण - JUSTIN TRUDEAU LIKELY TO RESIGN

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याविरोधात त्यांच्या पक्षातील खासदारांनी मोर्चा उघडला आहे. खासदारांनी जस्टीन ट्रुडो यांचा राजीनाम्याची मागणी केल्याचं वृत्त कॅनडातील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

Justin Trudeau Likely To Resign
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 10:44 AM IST

ओटावा : खलिस्तानी दहशतवादावरुन कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर अनेकदा टीका केली आहे. मात्र भारतानंही जस्टीन ट्रुडो यांच्या टीकेला जशास तसं उत्तर दिलं. आता जस्टीन ट्रुडो यांच्याबाबत महत्वाची घडामोड घडत आहे. पक्षांमध्ये वाढत असलेल्या त्यांच्याबाबतच्या मतभेदावरुन मोठा असंतोष उफाळून आला आहे. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. याबाबत कॅनडाच्या एका आघाडीच्या माध्यम समूहानं त्यांच्या पक्षाच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. जस्टीन ट्रुडो हे आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय लिबरल पार्टी कॉकससमोर बुधवारी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. लिबरल पक्षानं नवीन नेतृत्व शोधण्यास सुरुवात केली असल्याचंही या प्रसारमाध्यमानं स्पष्ट केलं आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो 2015 मध्ये आले सत्तेवर : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे 2015 मध्ये सत्तेवर आले होते. त्यानंतर त्यांनी 2019 आणि 2021 मध्ये आपली सत्ता कायम राखली. मात्र सत्तेवर आल्यानंतर जस्टीन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षात अनेक मतभेद असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे जस्टीन ट्रुडो यांच्याबाबत असंतोष उफाळून आला. पक्षातील अंतर्गत बंड कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना मोडून काढता आले नाहीत. त्यामुळे आता जस्टीन ट्रुडो यांना केव्हाही आपला राजीनामा सादर करण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रीय कॉकस बैठकीपूर्वी जस्टीन ट्रुडो देऊ शकतात राजीनामा : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी सत्ता संपादन केल्यानंतर पक्षात मतभेद उफाळून आले. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी कंझर्व्हेटिव्ह पियरे पॉइलीव्हरे यांनी जनमत सर्वेक्षणात 20 गुणांनी मागं टाकलं. त्यामुळे जस्टीन ट्रुडो यांच्या पक्षात मोठी चलबिचल झाली. नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितलं की पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांच्या राजीनाम्याच्या घोषणेची फक्त वेळ अनिश्चित आहे. बुधवारी महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कॉकस बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी ते राजीनामा देण्याची घोषणा करतील, असा त्यांचा अंदाज आहे. "जस्टीन ट्रूडो यांना त्यांच्या खासदारांनी हकालपट्टी टाळण्यासाठी कॉकस बैठकीपूर्वी घोषणा करण्याचं महत्त्व समजलं आहे," अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

आज देऊ शकतात जस्टीन ट्रुडो राजीनामा : लिबरल पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनं नेतृत्व कसं हाताळावं याविषयी कोणतीही स्पष्टता नाही. जस्टीन ट्रुडो ताबडतोब पायउतार होतील की त्यांचे उत्तराधिकारी निवडण्यात येईपर्यंत पंतप्रधान म्हणून काम करत राहतील, हे अनिश्चित आहे. लिबरल पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी या आठवड्यात कॉकस बैठकीनंतर भेटण्याची योजना आखत आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी दिला राजीनामा : जस्टीन ट्रूडोच्या लिबरल कॉकसची बुधवारी बैठक होणार आहे. खासदारांनी जस्टीन ट्रुडोंनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. खासदार 27 जानेवारी रोजी ओटावा इथं परतणार आहेत. तीन मुख्य विरोधी पक्षांनी सरकार पाडण्याची योजना आखली आहे, अशी खास माहिती त्यांना मिळाली आहे, असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. 16 डिसेंबरला माजी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची घोषणा केली. पंतप्रधान ट्रुडो यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलं, "सरकारमध्ये काम करणं हा माझ्या आयुष्यातील सन्मान आहे. कॅनडा आणि कॅनडांच्या नागरिकांसाठी काम करून आम्ही खूप काही साध्य केलं आहे. मात्र चिंतन केल्यावर मी असा निष्कर्ष काढला आहे की माझ्यासाठी मंत्रिमंडळाचा राजीनामा देणे हा एकमेव प्रामाणिक आणि व्यवहार्य मार्ग आहे."

हेही वाचा :

  1. भारत कॅनडा द्विपक्षीय संबंधातील कडवटपणा ट्रुडोंच्या राजकीय भवितव्यासाठी घातक
  2. ट्रुडोंच्या उपस्थितीत कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक घोषणाबाजी, भारतानं दिली कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावून समज - India summons Canadian diplomat

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.