ETV Bharat / entertainment

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं मराठी चित्रपट 'गुलकंद'चा टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ - GULKAND TEASER OUT

सई ताम्हणकर- समीर चौघुले, प्रसाद ओक - ईशा डे अश्या भन्नाट जोड्या असलेला चित्रपट 'गुलकंद'चा टीझर रिलीज झाला आहे.

Gulkand movie
गुलकंद चित्रपट (Movie poster (Source : reporter))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 14, 2025, 12:35 PM IST

मुंबई - चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना नवनवीन जोड्या बघायला आवडतात. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक वेगवेगळ्या कलाकारांच्या जोड्या प्रेक्षकांसमोर आणत असतात. आता 'गुलकंद' या चित्रपटात सई ताम्हणकर - समीर चौघुले, प्रसाद ओक - ईशा डे हे पडद्यावर प्रथमच कपल म्हणून झळकणार आहेत. प्रेम आणि नातेसंबंधांवर आधारित या चित्रपटाचा टीझर व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे.

'गुलकंद'चा टीझर रिलीज : टीझरमध्ये दोन वेगवेगळ्या कुटुंबांच्या नातेसंबंधांचा तरल प्रवास मांडण्यात आल्यासारखा दिसतोय. या चित्रपटाच्या निमित्तानं सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही जोडी पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहे, तर प्रसाद ओक आणि ईशा डे यांची हटके केमिस्ट्रीही प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. सई आणि समीर यांच्यातील सोज्वळ प्रेम आणि प्रसाद-ईशा यांच्यातील गंमतीशीर खटकेबाजी, यामुळे हा चित्रपट हलकाफुलका आणि मनोरंजक असणार आहे. संवादांची सहजता, कलाकारांची उत्कटता आणि प्रेमाची झलक यामुळे 'गुलकंद' हा एक उत्तम फॅमिली-कॉमेडी चित्रपट ठरेल, असे निर्माते दिग्दर्शक म्हणत आहेत.

'गुलकंद'ची स्टार कास्ट : दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या कल्पनेतून साकारलेला 'गुलकंद' चित्रपट एका मधुर नात्याचा वेध घेतो. यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक व्यतिरिक्त वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांसारखे प्रतिभावान कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाची कथा सचिन मोटे यांनी लिहिली असून, निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे.

सचिन गोस्वामीनं चित्रपटाबद्दल सांगितलं : दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाबद्दल म्हटलं की, 'गुलकंद' हा नातेसंबंधांमधील गोडवा आणि आयुष्यातील मजेशीर अनुभव मांडणारा चित्रपट आहे, ज्याच्याबरोबर प्रेक्षक रिलेट करू शकतील. हा एक भन्नाट फॅमिली-कॉमेडी सिनेमा असून आम्हाला तो बनविताना जेव्हडी मजा आली, त्यापेक्षा जास्त मजा प्रेक्षकांना बघताना येईल." एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमानं तयार झालेला 'गुलकंद' हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 1 मे रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय या चित्रपटाचा टीझर देखील अनेकांना आवडत आहे. अनेक प्रेक्षक या चित्रपटाच्या टीझरचे कौतुक करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.