फ्लोरिडा : नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita williams) गेल्या सात महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकल्या आहेत. सात महिन्यात पहिल्यांदाच त्यांनी अंतराळ स्थानकाच्या बाहेर येऊन स्पेसवॉक केलं आहे. खरंतर, आयएसएस कमांडर सुनीता विल्यम्सला सहकारी अंतराळवीर निक हेग यांच्यासोबत काही प्रलंबित बाह्य दुरुस्तीची कामं करायची आहेत. नासानं एक्सवर स्पेसवॉकचे थेट प्रक्षेपण केलं आहे. नासाच्या मते, भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सचा हा आठवा स्पेसवॉक होता.
अंतराळ स्थानकाला दिली भेट : "नासाचे दोन अंतराळवीर, निक हेग आणि सुनीता विल्यम्स, यांनी आमच्या NICER (न्यूट्रॉन स्टार इंटिरियर कंपोझिशन एक्सप्लोरर) एक्स-रे टेलिस्कोपच्या दुरुस्तीसह स्टेशन अपग्रेडला पाठिंबा देण्यासाठी अंतराळ स्थानकाला भेट दिली," असं अमेरिकन अंतराळ संस्थेने एक्सवर व्हिडिओ शेअर करताना लिहिलं.
सात महिन्यांपासून अवकाशात अडकले होते : विल्यम्स आणि निक यांनी गेल्या जूनमध्ये बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले होते. ही एक आठवडाभराची चाचणी उड्डाण होती, म्हणजेच त्यांना एका आठवड्यात पृथ्वीवर परतायचे होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळं, नासाचे दोन्ही अंतराळवीर सात महिन्यांपासून अवकाशात अडकले आहेत. सुनीता विल्यम्स आणि निक हेग यांच्या पृथ्वीवर परतण्याची जगभरातील नागरिकांना आस लागली आहे. याबाबत हे दोघंही लवकरच परततील, असं नासाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.
अवकाशातूनच केलं नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि निक हेग हे गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. त्यांनी अवकाशातूनच 2025 या नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. या दोन अंतराळवीरांनी त्यांच्या सहकारी क्रू सदस्यांसह, अवकाशातून पृथ्वीची काही दृश्ये पाहिली.
हेही वाचा -