ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये जवानांना मोठं यश; 12 नक्षलवाद्यांचा केला खात्मा - NAXAL ENCOUNTER IN BIJAPUR

बीजापूरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठ यश मिळालं आहे. जवानांनी तब्बल 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे, ही घटना छत्तीसगड तेलंगाणा सीमावर्ती परिसरात घडली आहे.

NAXAL ENCOUNTER IN BIJAPUR
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2025, 10:50 PM IST

रायपूर : सुरक्षा दलाच्या जवानांना छत्तीसमगडमधील कारवाईत मोठं यश मिळालं आहे. जवानांनी नक्षलवाद्याशी झालेल्या चकमकीत तब्बल 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. छत्तीगड तेलंगाणा सीमावर्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या नक्षलवादी चकमकीत सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांना ठार मारलं आहे, अशी माहिती सुरक्षा दलाच्या वतीनं देण्यात आली.

12 नक्षलवाद्यांचा खात्मा : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजता सुरक्षा दलाचं एक संयुक्त पथक दक्षिण विजापूरच्या जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवर गेलं होतं. यावेळी जवानांनी शोध घेतला असता नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाली. संध्याकाळपर्यंत नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरूच होता. या कारवाईत राज्य पोलिसांच्या तीन जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक (DRG), COBRA च्या पाच बटालियन (CRPF चे एक एलिट जंगल युद्ध युनिट - रिझोल्यूट अॅक्शनसाठी कमांडो बटालियन) आणि CRPF ची 229 वी बटालियन सहभागी यांनी सहबाग घेतला. यावेळी झालेल्या चकमकीत जवानांनी तब्बल 12 नक्षलवाद्यांचा खातमा केला. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांची कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं यावेळी सुरक्षा दलाच्या वतीनं सांगण्यात आलं. सुरक्षा दल परतल्यानंतर पोलीस सविस्तर माहिती देतील, असंही यावेळी सांगण्यात आलं.

नवीन वर्षाची धमाकेदार सुरूवात : या वर्षी जानेवारी 2025 सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. आतापर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकीत 26 नक्षलवादी मारले गेले आहेत. 12 जानेवारीला बिजापूर जिल्ह्यातील मद्दीद पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या चकमकीत दोन महिलांसह पाच नक्षलवादी ठार झाले. गेल्या वर्षी 2024 मध्ये, राज्यात वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी 219 नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

हेही वाचा :

  1. गडचिरोलीत आशेचा नवा किरण; बंदूक, बॉम्बशी खेळणाऱ्या जहाल नक्षलवाद्यांना स्टील कंपनीत नोकरी
  2. जवानांनी उधळला नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव : 22 किलो आयईडी स्फोटकं केले निकामी
  3. सुकमात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; घटनास्थळावर 30 ते 40 नक्षलवादी असल्याचा दावा - Sukma Naxal Encounter

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.