मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील गाणी खूप जास्त प्रसिद्ध झाली आहेत. ही गाणी कुठल्याही कार्यक्रमात वाजली तर अनेकांना डान्स करण्याची इच्छा होते. आज आम्ही अशा काही गाण्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जे तुम्ही आपल्या प्ले लिस्टमध्ये सामील करून यावर सुंदर डान्स करून स्वत:चे मनोरंजन करू शकता.
1 कोंबडी पळाली : भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, कुशल बद्रिके, प्रिय बेर्डे अभिनीत 'जत्रा' या चित्रपटामधील 'कोंबडी पळाली' हे गाणं खूप हिट झालं आहे. हे गाणं अनेक कार्यक्रमात वाजविल्या जाते. या गाण्याला अजय-अतुल, यांनी संगीत दिलं आहे. 'जत्रा' चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. या गाण्यात भरत जाधव आणि क्रांती रेडकर हे कलाकार आहेत. 'कोंबडी पळाली' गाणं आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तसेच हे गाणं जितेंद्र जोशी यांनी लिहिलं आहे.
2 ही पोली साजूक : प्रथमेश परब, वैभव मांगले, केतकी माटेगांवकर स्टारर 'टाईम पास' चित्रपटामधील गाणी आणि डायलॉग हे खूप प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटामधील 'ही पोली साजूक' गाणं प्रचंड डिजेवर वाजविले जाते. हे गाणं खूप धमाकेदार आहे. या गाण्याला रेश्मा सोनवणे आणि मनोहर कोळंब्रे यांनी गायलं आहे. 'ही पोली साजूक' गाण्याला चिनार खारकर यांनी संगीत दिलं आहे. तसेच या गाण्यात प्रथमेश परब, केतकी माटेगांवकर आणि शिबानी दांडेकर हे कलाकार आहेत.
3 झिंगाट : ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट 'सैराट'मधील 'झिंगाट' गाणं खूप लोकप्रिय झालं आहे. या गाण्याला अजय - अतुलनं संगीत दिलंय आणि गायलं देखील आहे. हे गाणं संपूर्ण भारतात मोठ्या आवडणं वाजविल्या जाते. 'सैराट' या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं आहे. या गाण्यात रिंकू राजगुरू, आकाश ठोसर आणि तानाजी गलगुंडे हे कलाकार आहेत.
4 अप्सरा आली : रवी जाधव दिग्दर्शित 'नटरंग' चित्रपटात अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांनी जबरदस्त अभिनय केला. या चित्रपटामधील 'अप्सरा आली' हे गाणं तर अनेकांना पसंत पडले होते. या गाण्याला संगीत अजय अतुल यांनी दिलं आहे. हे गाणं बेला शेंडे, अजय अतुल यांनी गायलं आहे. या गाण्यात अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी हे कलाकार दिसले आहेत.
5 चंद्रा : 'चंद्रमुखी' या चित्रपटामधील 'चंद्रा' गाणं खूप लोकप्रिय झालं आहे. हे गाणं वाजल्यानंतर पाय आपोआप थिरकायला लागतात. 'चंद्रमुखी' या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केलं आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ एम कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसातकर, समीर चौघुले हे कलाकार आहेत. 'चंद्रा' गाण्यात अमृता खानविलकरनं सुंदर डान्स केला आहे. या गाण्याला संगीत अजय - अतुल यांनी दिलं आहे. याशिवाय हे गाणं श्रेया घोषाल यांनी गायलं आहे.