ओटावा - जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा तीव्र दबाव आणि घटत्या लोकप्रियतेमुळं राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या खर्चामुळे, कॅबिनेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणे आणि प्रस्तावित यूएस टॅरिफमुळे ट्रुडो यांना टीकेचा सामना करावा लागला. लिबरल पक्षाच्या नेतेपदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. आता पक्षासमोर नेतृत्वाचं आव्हान आहे. तसंच सार्वत्रिक निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी त्याचा हा निर्णय आला आहे.
कॅनडाचे जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी पंतप्रधान आणि लिबरल पक्षाचे नेते या दोघांनीही पदांचा राजीनामा देण्याची घोषणा केली. बऱ्याच दिवसांपासून अपेक्षित असलेल्या भाषणादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. निर्णय जाहीर करण्यापूर्वी ते म्हणाले, सुट्ट्यांमध्ये मला विचार करायला वेळ मिळाला.
" ...i intend to resign as party leader, as prime minister after the party selects its next leader...last night i asked the president of the liberal party to start that process..," says canadian pm justin trudeau.
— ANI (@ANI) January 6, 2025
(source: cbc via reuters) pic.twitter.com/sxN5ZI47be
"पक्षाचा पुढचा नेता निवडल्यानंतर पंतप्रधान म्हणून तसंच पक्षाचा नेता म्हणून राजीनामा देण्याचा माझा मानस आहे. काल रात्री मी लिबरल पक्षाच्या अध्यक्षांना याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलं," असं ट्रूडो म्हणाले, तसंच लवकरच ते पद सोडतील. सत्ताधारी लिबरल पक्ष नवीन नेता निवडेल अशी माहितीही त्यांनी दिली.
कॅनडामध्ये अन्नधान्य आणि घरांच्या वाढत्या किमतीसह अनेक मुद्द्यांवरून ट्रुडो यांना टीकेचा सामना करावा लागला. अलिकडच्या काळात त्यांच्यावर पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याच्यासाठी दबाब येत होता. तसंच 16 डिसेंबर रोजी देशाच्या अर्थमंत्र्यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मौन बाळगलं होतं.
सुरुवातीला कॅनडाच्या 2015 च्या निवडणुकीत उदारमतवादी मूल्ये पुन्हा आणल्याबद्दल ट्रुडो यांची वाहवा झाली होती. त्यानंतर या 53 वर्षीय नेत्याची लोकप्रियता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. हे राजकीय संकट कॅनडासाठी आव्हानात्मक वेळी आलं आहे.
जस्टीन ट्रुडो त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यामुळे, ऑक्टोबरच्या अखेरीस होणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी लिबरल पक्षाला नेतृत्वाला हा मोठा झटका मानला जात आहे.
अलिकडच्या काळात ट्रुडोंचा पाठिंबा कमी होताना दिसला आहे. त्यातच आता त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.