कोलकाता IND Beat ENG by 8 Wickets : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात आजपासून पाच सामन्यांची T20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना यजमान भारतीय संघानं सात गडी राखून जिंकला आहे. यासह भारतानं मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे. भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या वादळी खेळीच्या बळावर भारतानं इंग्लंडनं दिलेलं मापक लक्ष्य अवघ्या 12.5 षटकांत गाठलं.
भारताची धारदार गोलंदाजी : कोलकाता येथील ईडन गार्डन वर झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीलाच इंग्लंडच्या संघाला जोरदार धक्के दिले. वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंगनं पहिल्याच षटकात सलामीवीर फील सॉल्ट याला बाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर मधल्या षटकांमध्ये वरून चक्रवर्तीनं तीन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडला. पुढे शेवटच्या षटकांमध्ये अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी चांगली गोलंदाजी केली. परिणामी इंग्लंडला निर्धारित 20 षटकांत 132 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून कर्णधार जॉस बटलरनं सर्वाधिक 68 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांनी त्याला साथ दिली नाही, तर भारताकडून वरून चक्रवर्तीनं 3 तर अर्षदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
Abhishek Sharma's explosive knock outclassed England in the T20I series opener in Kolkata 💥#INDvENG 📝: https://t.co/9nrI1DaGqi pic.twitter.com/aLigXoyyaN
— ICC (@ICC) January 22, 2025
भारताची आक्रमक सुरुवात : इंग्लंडला दिलेल्या 133 धावांच्या माफक लक्ष्याणा पाठलाग करायला उतरलेल्या भारतानं आक्रमक सुरुवात केली. सलामीला आलेल्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी सुरुवातीच्या चार षटकांत 39 धावा करत भारताचा विजय जवळ जवळ निश्चित केला. मात्र यानंतर पाचव्या शतकात इंग्लंडच्या गोलंदाज जोफ्रा आर्चरनं संजू सॅमसन (26)आणि सूर्यकुमार यादव (0) यांना लागोपाठ बात करत भारताला काहीसा अडचणीत आणलं. मात्र याच्या पुढच्या षटकात सलामीवीर अभिषेक शर्मानं षटकार-चौकार ठोकत पुन्हा सामना भारताच्या बाजूनं झुकवला. अभिषेक शर्मानं 34 चेंडूत 79 धावांची वादळी खेळी करत भारताला विजयासमीप नेलं. मात्र भारताला विजयासाठी आठ धावांची गरज असताना आक्रमक फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत पाच चौकार आणि आठ षटकारांची आतषबाजी केली.
𝗔 𝗱𝗼𝗺𝗶𝗻𝗮𝘁𝗶𝗻𝗴 𝘀𝗵𝗼𝘄 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗘𝗱𝗲𝗻 𝗚𝗮𝗿𝗱𝗲𝗻𝘀! 💪 💪#TeamIndia off to a flying start in the T20I series, sealing a 7⃣-wicket win! 👏 👏
— BCCI (@BCCI) January 22, 2025
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/hoUcLWCEIP
अर्षदीप सिंगनं रचला इतिहास : हा सामना वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग याच्यासाठी ऐतिहासिक ठरला. वास्तविक आर्षदीप सिंग आता भारतासाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्यानं फिरकीपटू यजुवेंद्र चहल याला मागे टाकलं आहे. या सामन्यापूर्वी अर्षदीप सिंगचे T20I मध्ये 95 बळी होते. तर यजुव्रेंद चहल 96 विकेटसह अव्वल स्थानी होता. मात्र या सामन्यात अर्षदीप सिंग दोन विकेट घेत चहलला मागे टाकत भारताकडून आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
𝘼 𝙎𝙩𝙮𝙡𝙞𝙨𝙝 𝙁𝙞𝙛𝙩𝙮 😎
— BCCI (@BCCI) January 22, 2025
Abhishek Sharma starts the #INDvENG T20I series on the right note 👍
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/U7Mkaamnfv